TMKOC: ‘जेठालाल’ सोडणार तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका?

प्रेक्षक माझ्यावर फार प्रेम करतात मी त्यांनी विनाकारण दुखावू शकत नाही

tarak mehta ka ooltah chashmah serial fem jethalal actor dilip joshi left show?
TMKOC: 'जेठालाल' सोडणार तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका?

मागील काही वर्षांपासून तारक मेहता काल उल्टा चश्मा या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. मालिका टिआरपी रेटींगमध्ये देखील सर्वांत टॉपवर आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील जेठालालने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी हे मलिका सोडत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मालिका इतकी प्रसिद्ध होत असलताना दिलीप जोशी जेठालाल ही भूमिका का सोडत असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र या चर्चांना स्वत: जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी पूर्णविराम दिला आहे.

ताकर मेहतामधील जेठालाल मालिका सोडणार का या प्रश्नाचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीदरम्यान दिले ते म्हणाले, ‘प्रेक्षक आम्हाला इतके प्रेम देत असताना मी ही मालिका का सोडेन. मला जेठालालची भूमिका करताना आनंद मिळत आहे. ज्या दिवसापर्यंत मला माझ्या कामातून आनंद मिळत आहे तोपर्यंत मी काम करणार’, असे दिलीप जोशी यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, ‘मला अनेक नव्या कार्यक्रमांच्या ऑफर्स येत असतात. पण इथे एक चांगला शो सुरू असताना कारण नसताना तो सोडण्यात काहीही अर्थ नाही. एक चांगला प्रवास सुरू आहे आणि मी त्यात खूश आहे. प्रेक्षक माझ्यावर फार प्रेम करतात मी त्यांनी विनाकारण दुखावू शकत नाही’.

दिलीप जोशी यांनी आधी एका मुलाखतीत त्यांच्या स्ट्रगल विषयी सांगितले होते. ते म्हणाले होते तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मिळण्याआधीचा काळ फार कठीण होता. हा शो साइन करण्याआधी एक वर्ष माझ्याकडे कोणतेच काम नव्हते. माझ्याकडे कोणतीही नोकरीही नव्हती. मात्र या शोनंतर माझं करिअर बनले.


हेही वाचा – प्रेक्षकांना हसवणारा ‘जेठालाल’ मुलीच्या लग्नात भावूक! पांढऱ्या झालेल्या केसांनीच लेक चढली बोहल्यावर