व्हायरल मिम्सवरून ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणारा अभिनेता संतापला

'धर्मवीर-मु.पो.ठाणे' या चित्रपटामध्ये क्षितीश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. यावरून सध्या अनेक मीम व्हायरल होत आहेत. या मीम वरूनच अभिनेता क्षितीश दाते संतापलेला आहे

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी उलथा पालथ होत आहे. मंगळवारपासून एकामागेएक अश्या अनेक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. अशात सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांमध्ये अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. धर्मवीर चित्रपटावरून देखील काही व्हिडीओ आणि मीम्स व्हायरल होत आहेत. याचं मीम्स वरून ‘धर्मवीर-मु.पो.ठाणे’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणारा अभिनेता क्षितीश दाते या मीमवरून राग व्यक्त केला आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

मीम्स छापण्यावरून संतापला अभिनेता
‘धर्मवीर-मु.पो.ठाणे’ या चित्रपटामध्ये क्षितीश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. यावरून सध्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्स वरूनच अभिनेता क्षितीश दाते संतापलेला आहे. याचं कारण म्हणजे एका वृत्तपत्राने ‘धर्मवीर-मु.पो.ठाणे’ चित्रपटातील क्षितीश दाते याचा फोटो छापून बाजूला थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या, असं लिहिलेलं हे मीम छापलेले आहे.

या मीमच कात्रण क्षितीश दाते याने आपल्या इंस्टग्राम स्टोरीला शेअर करत राग व्यक्त केला आहे. त्याने या स्टोरीमध्ये लिहिलंय की, “हे असं छापणं चूक आहे!!! मोठी राजकीय उलाढाल चालू आहे! चेश्टेत memes येणं वेगळं, आणि वर्तमानपत्रात छापणं वेगळं!!” असे त्याने लिहिले आहे.

‘धर्मवीर-मु.पो.ठाणे’ चित्रपटामध्ये क्षितीश दाते याने एकनाथ शिंदेंची भूमिका साकरली होती. एकनाथ शिंदेंची व्यक्तिरेखी उत्तम साकारली होती.