घरमनोरंजननिर्भया प्रसंगावर 'दिल्ली बस' चित्रपट; ट्रेलर आऊट!

निर्भया प्रसंगावर ‘दिल्ली बस’ चित्रपट; ट्रेलर आऊट!

Subscribe

निर्भया बलात्कार प्रकरणाला ६ वर्ष पूर्ण होत असतानाच या प्रसंगावर आधारीत दिल्ली बस या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दिल्लीमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. निर्भया बलात्कार प्रकरणाला काल, रविवारी ६ वर्ष पूर्ण होत असतानाच या प्रसंगावर आधारीत दिल्ली बस या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.  चालत्या बसमध्ये निर्भयावर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर राजधानीत उग्र निदर्शनं करण्यात आली होती. तसंच देशात ठिकठिकाणी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मोर्चेही काढण्यात आले. याच घटनेवर आधारीत ‘दिल्ली बस’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

 

- Advertisement -

वाचा : सहा वर्षे! प्रतिक्षा न्यायाची; अंगावर काटा आणणारी काळरात्र

- Advertisement -

वाचा : राजधानीत दिल्लीत चिमुरडीवर बलात्कार, स्थानिकांनी चोपलं

ज्वलंत विषयावर चित्रपट 

निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्दर्शक शारीक मिन्हाज हा चित्रपट घेऊन येत आहेत. यापूर्वी शारीक यांनी ज्वलंत विषयांवर चित्रपट केले आहेत. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर ‘चांद बुझ गया’, गुजरात माफिया या विषयावर ‘लतीफ – द किंग ऑफ क्राईम’ आणि कश्मीर मुद्यावर आधारलेला ‘चिनार – दास्तान-ए-इश्क’ या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तर दिल्ली बस हा सिनेमा पुढील वर्षात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -