घरमनोरंजनRRR Box Office Collection : RRR या चित्रपटाने जमा केला 900...

RRR Box Office Collection : RRR या चित्रपटाने जमा केला 900 कोटींचा गल्ला

Subscribe

आरआरआर सिनेमाने भारतातचं नाहीत तर विदेशात ही जास्त कमाई करत आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाने द काश्मीर फाइल, गंगूबाई काठियावाली सिनेमांना मागे टाकले आणि बॉक्स ऑफिसवर (Box office) कमाल करत आहे.

दिग्दर्शक एसएस राजमौली (SS Rajmouli) यांचा आरआरआर (RRR) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने भारतातचं नाही तर विदेशातही जबरदस्त कमाई केली आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाने द काश्मीर फाइल, गंगूबाई काठियावाडी सिनेमांना मागे टाकले आणि बॉक्स ऑफिसवर (Box office) कमाल करत भरघोस कमाई केली. दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटामध्ये रामचरण (Ramcharan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) हे मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच अजय देवगण या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार असून, एक मजबूत पात्र साकारत आहे. याआधी रजनीकांतच्या चित्रपटाने 800 कोटींची कमाई केली होती. मात्र आरआरआर या चित्रपटाने रजनीकांतच्या चित्रपटाची पिछेहाट करून 900 कोटींचा गल्ला जमा केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

- Advertisement -

आरआरआर या चित्रपटाची आठवड्याची आकडेवारी

- Advertisement -

व्यापार विश्लेषक मोराले विजयबालन (Morale Vijayabalan) यांनी आरआरआर या सिनेमाने नवव्या दिवशी केलेल्या कमाईचा आकडा ट्विटवर शेअर केला आहे. आरआरआर या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे. तर पहिल्या दिवशी 709.36 कोटींची कमाई या सिनेमाने केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 41.53 कोटी, दुसऱ्या दिवशी 68.17 आणि तिसऱ्या दिवशी 82.40 कोटींची कमाई केली आहे. असे सर्व मिळून 10 व्या दिवशी 901.40 कोटींचा गल्ला जमा केला आहे.

 

 

आरआरआर सिनेमा 10 दिवसांत 500 कोटींचा आकडा पार करणारा हा पाचवा चित्रपट बनला आहे. या यादीमध्ये दंगल, बाहुबली 2, बजरंगी भाईजान आणि सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -