घरमनोरंजनCannes 2022 : कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये दीपिका पदुकोण दिसणार ज्यूरी मेंबरच्या भूमिकेत

Cannes 2022 : कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये दीपिका पदुकोण दिसणार ज्यूरी मेंबरच्या भूमिकेत

Subscribe

या वर्षी इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधून Cannes Film Festival मध्ये मेंबर म्हणून सहभागी होणारी दीपिका भारतातली एकटी अॅक्टर आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण 2022 मधील Cannes Film Festival 2022 च्या कॉम्पिटीशनमध्ये ज्यूरी मेंबर म्हणून सहभागी होणार आहे. या वर्षी इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधून Cannes Film Festival मध्ये मेंबर म्हणून सहभागी होणारी दीपिका भारतातली एकटी अॅक्टर आहे. या वर्षीच्या 75 व्या फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यूरीला फ्रेंच अॅक्टर विनसेंट लिनडन हेड करेल. हा फेस्टिवल 17 ते 28 मे 2022 या कालावधीत होणार आहे.

दीपिका पादुकोण सोबत हे असतील जूरी मेंबर
दीपिका पादुकोण ज्या ज्यूरीची मेंबर आहे, तिथे एकूण ८ जज असतील. हे ज्यूरी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या 21 चित्रपटांतील एका चित्रपटाला शनिवारी २८ मे रोजी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये पाम अवॉर्ड दिला जाईल. ज्यूरीच्या इतर सदस्यांमध्ये फिल्ममेकर रेबेका हाल, स्वीडिश अॅक्टर नूमी रैपेस, इटालियन अॅक्टर जैसमिन ट्रिंका, ईरानी फिल्ममेकर असगर फरहादी, फ्रेंच फिल्ममेकर लैज ली, जेफ निकोलस आणि डायरेक्टर वाकहिम ट्रियर हे सर्व सहभागी होतील.

- Advertisement -

सोशल मीडियावर होत आहे दीपिकाचं कौतुक
दीपिका पादुकोणच्या कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये सहभागी होण्यची बातमी कळताचं सोशल मीडियावर दीपिकाचे चाहते तिला भरभरुन शुभेच्छा देत आहेत.

याआधी भारतातले हे कलाकार झाले होते ज्यूरी मेंबर
दीपिका पादुकोणच्या याआधी इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधून मृणाल नायर, मीरा नायर , अरूंधति रॉय, ऐश्वर्या राय, नंदिता दास, शर्मिला टागोर, शेखर कपूर आणि विद्या बालन हे Cannes Film Festival मध्ये ज्यूरी म्हणून सहभागी झाले होते.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिका ‘गहराइया’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे सोबत दिसून आली होती.आता लवकरंच ती शाहरूख खानसोबत पठान चित्रपटात दिसून येईल.

 

विल स्मिथच नाही तर हे हॉलीवूडस्टारही करतात हिंदू धर्म फॉलो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -