घरताज्या घडामोडीठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांचे 'ते' ट्विट व्हायरल; सर्वत्र नव्या चिन्हाची रंगली...

ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांचे ‘ते’ ट्विट व्हायरल; सर्वत्र नव्या चिन्हाची रंगली चर्चा

Subscribe

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हा तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि गटाला जोरदार झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत दोन्ही गटाला नव्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्याय दिला आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हा तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि गटाला जोरदार झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत दोन्ही गटाला नव्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्याय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे. (tweet from Thackeray group secretary Milind narvekar about the party new symbol)

ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नार्वेकरांनी वाघाचा फोटो आणि खाली “आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे लिहिले आहे. त्यामुळे नव्या चिन्हामध्ये ठाकरे गटाकडून वाघ हे चिन्ह मागण्यात येणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.


हेही वाचा – जिंकून दाखवणारच! चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -