घरमनोरंजन'मी वसंतराव' चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच कलाकारांचीही दिलखुलास पसंती

‘मी वसंतराव’ चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच कलाकारांचीही दिलखुलास पसंती

Subscribe

'मी वसंतराव' हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा केवळ एक चित्रपट नसून यामधून बोध घेण्यासारखे खूप काही आहे

‘मी वसंतराव’ हा नवा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘मी वसंतराव’  या चित्रपटाचे सिनेसृष्टीतील कलाकारांनी खूप कौतुक केले आहे. इतकचं नव्हे तर,या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ हे मुख्य भूमिकेत आहेत.

‘मी वसंतराव’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा केवळ एक चित्रपट नसून यामधून बोध घेण्यासारखे खूप काही आहे. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारींनी या चित्रपटाची उत्कृष्ट मांडणी केली आहे, तसेच या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी त्यांच्या मुख्य भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. याचित्रपटाबाबत संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात की, ”हा चित्रपट माझ्या जवळच्या लोकांनी बनवलेला आहे. मला अभिमान वाटतो की, माझ्या मराठी सिनेसृष्टीत असा संगीतमय चित्रपट बनवला गेला.”, “आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून दिसून येतय. मात्र हे अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा,” असे आवाहन अभिनेते मकरंद देशपांडे यांनी केले आहे.

- Advertisement -

जिओ स्टुडिओजने ‘मी वसंतराव’ च्या निमिताने ही नवी सुरुवात केली आहे. या चित्रपटाला अश्विनी भावे, रेणुका शहाणे, अंकुश चौधरी, गितांजली कुलकर्णी, आदित्य सरपोतदार, स्वप्नील बांदोडकर, रवी जाधव, वैदेही परशुरामी इत्यादी कलाकारांनी चित्रपटाबाब सकारत्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाला मिळालेल्या या प्रेमाबद्दल आणि यशाबद्दल दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात की, ” प्रेक्षक, सिनेसृष्टीतील मंडळी, मित्रपरिवार या सगळ्यांकडून आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे मला खूपच आनंद झाला आहे. इतक्या वर्षांच्या मेहनतीची चीज झाल्याचा भाव सध्या मनात आहे. सर्वांचेच मनापासून आभार.’

- Advertisement -

 

हेही वाचा :‘भारत माझा देश आहे’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -