प्रियंका, आलिया आणि कतरिनाच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. येत्या काळात या तिन्ही लोकप्रिय अभिनेत्री बहुप्रतिक्षित ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. याचं चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे या तिघींचे चाहते खूप खूश झाले आहेत.

लवकरच सुरु होणार ‘जी ले जरा’ चित्रपटाचं शूटिंग

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफचा आगामी ‘जी ले जरा’ चित्रपट आता खऱ्या अर्थाने पुन्हा चर्चेत आला आहे. 2023 च्या सुरुवातीपासून यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. ही बातमी कळताच आलिया, प्रियांका आणि कतरिनाचे चाहते खूप खूश झाले आहेत.

पहिल्यांदा तिघी दिसणार एकत्र
आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र एका चित्रपटात दिसणार आहेत. ‘जी ले जरा’ या चित्रपटाची कथा ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ या चित्रपटासारखी असल्याचं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

लोकांकडे नीट खायला जेवण नाही पण दुसऱ्यांच्या कपड्यांवर… ‘पठाण’ वादावर रत्ना पाठक यांची प्रतिक्रिया