घरमनोरंजनविद्या बालनच्या 'शेरनी’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज!

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज!

Subscribe

ट्रेलरला पाहून चाहत्यांच्या मानत सिनेमा पाहण्याची उस्तुक्ता वाढू लागली आहे. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले हा सिनेमा आहे.

अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूडमध्ये डरकाळी फोडण्यास सज्ज झाली आहे. विद्याचा बहूचर्चित सिनेमाचा ‘शेरनी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये विद्या एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरला पाहून चाहत्यांच्या मानत सिनेमा पाहण्याची उस्तुक्ता वाढू लागली आहे. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले हा सिनेमा आहे. एका चाकोरी बाहेरील नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या सिनेमात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.

काय दाखवण्यात आलं आहे ट्रेलर मध्ये –

ट्रेलरची सुरुवात घनदाट जंगलापासून होते. तसेच विद्या बालन फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत असल्याने तिला तिकडे सिंहाला पकडण्याकरिता नियुक्त करण्यात आलं आहे. सिहांच्या भीतीमुळे गावातील माणसे घराबाहेर पडण्यास सुद्दा घाबर असल्याचे दिसतेय.सिनेमा मधील डायलॉग आणि विद्याचा अभिनयातील अंदाज खूप प्रभावित करणारा ठरला आहे. ट्रेलर 2 मिंनट 16 सेकेंड इतका दाखवण्यात आलाय.विद्याने आपल्या दमदार अभिनयाने चार चाँद लावले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. प्रेक्षकांमध्ये  आता आशयघन  चित्रपट पाहण्याचा कल वाढतोय. यामुळे विद्या दिवसेंदिवस खूप विचारपूर्वक सिनेमाची निवड करताना दिसतेय.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -

“ट्रेलर लॉन्चप्रसंगी स्वत:चा उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, “मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकले आणि ते मला भावले. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली सिनेमातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या सिनेमाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणे आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेले आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारे आहे. ही अभिनव व्यक्तिरेखा साकारताना मला फारच आनंद झाला. अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या माध्यमातून हे कथानक जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना अनपेक्षित मार्गांनी गुंतवून ठेवेल ही आशा बाळगते.”

शेरनी हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 18 जून ला रिलीज करण्यात येणार आहे. भारत आणि २४० हून अधिक देश-प्रदेशातील प्राईम सदस्यांना 18 जूनपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘शेरनी’ हा चित्रपट पाहता येणार आहे.


हे हि वाचा – चक्क आयफोनवर चित्रित झालेला’पिच्चर’ येतोय रसिकांच्या भेटीस

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -