नेपाळमधून भारतात पुन्हा दगडफेक; काली नदीवर बंधारा बांधण्यात अडथळा

pithoragarh stone pelting again-in india from nepal chaos among laborers constructing embankment on kali river in dharchula

नेपाळकडून आश्वासन मिळाल्यानंतरही सोमवारी पुन्हा विप्लव गटाच्या विद्यार्थी संघटनेने भारतावर दगडफेक करत वातावरण चिघळण्याचा प्रयत्न केला आहे. धारकुलामधील काली नदीच्या काठावर बंधारे बांधण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक मजुरांवर दगडफेकीची घटना घडली, यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नेपाळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक करणाऱ्यांचा पाठलाग केला,

बंधारा बांधणाऱ्या मजुरांवर दगडफेक

पंधरवड्यापूर्वीही नेपाळमधील काही समाजकंठकांनी भारतात बंधारा बांधणाऱ्या मजुरांवर दगडफेक केली होती. त्यामुळे येथे काम करणारा एक नेपाळी मजूर जखमी झाला. यानंतर भारत आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. यामध्ये नेपाळच्या बाजूने दगडफेकीसारख्या घटना भविष्यात घडणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले. चर्चेनंतर भारत आणि नेपाळने आपापल्या भागात काली नदीत साचलेला मलबा हटवण्याचे कामही सुरू केले होते.

नेपाळमधील दार्चुलामध्ये भारतविरोधी निदर्शने

सोमवारी नेपाळमधील दार्चुलामध्ये विप्लव गटाच्या विद्यार्थी संघटनेने भारतविरोधी निदर्शने केली. यापूर्वी, भारतातील बंधारा बांधणाऱ्या कंपनीने दगडफेक करणाऱ्या लोकांविरुद्ध धारचुला कोतवाली येथे एफआयआर दाखल केला होता. याच्या निषेधार्थ नेपाळी विद्यार्थी संघटनेने दार्चुला बाजारपेठेत भारतविरोधी घोषणा देत मिरवणूक काढली. मिरवणुकीत सहभागी असलेल्या अर्धा डझन लोकांनी धारचुलामध्ये बंधारा बांधणाऱ्या मजुरांवर दगडफेक केली.

भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या लोकांचा पाठलाग केला. एसडीएम धारचुला रजेवर असल्याने तहसील प्रशासनाने पिथौरागढ येथील जिल्हा दंडाधिकारी यांना कळवले. याप्रकरणी मंगळवारी जिल्हा प्रशासन नेपाळच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नेपाळमधून वारंवार होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे धारचुला परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


सरकारी नोकरीचं आमिष, मंत्रालयातच मुलाखती; शिपायाचा बनाव पोलिसांनी उधळला