घरताज्या घडामोडी'त्याने मागे स्पर्श केला, मी त्याचे बोटं पिरगाळले' - तापसी पन्नू

‘त्याने मागे स्पर्श केला, मी त्याचे बोटं पिरगाळले’ – तापसी पन्नू

Subscribe

बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आपल्या हटके अभिनयासाठी आता लोकप्रिय झालेली आहे. दक्षिणेतून येऊन बॉलिवूडमध्ये बस्तान बसविण्यासाठी तापसीला चांगलाच संघर्ष करावा लागला. यशस्वी कलाकार होण्यासाठी जसा तिला इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागतो, तसा एक महिला म्हणूनही. नुकतंच तिने करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वाँट २’ (What Women Want 2) या कार्यक्रमात आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग कथन केला. गुरुद्वारामध्ये आपल्याला मागून स्पर्श करणाऱ्या एका व्यक्तीचे बोटं पकडून पिरगळली असल्याची आठवण तापसीने सांगितली.

तापसी म्हणाली की, गुरुपुरबच्या काळाता आम्ही गुरुद्वारात जात असू. तिथे जेवण वाढणाऱ्या स्टॉल्ससमोर अनेकदा गर्दी असायची. बहुतेक वेळा अशा गर्दीत धक्काबुक्की होत राहायची. त्यामुळे आम्हाला त्याची सवयच झाली होती. मात्र एकेदिवशी वेगळाच प्रसंग घडला. गुरुद्वारात जातानाच आज काहीतरी चुकीचे घडेल, असे वाटत होते. त्यासाठी मी माझी मानसिक तयारी देखील केली होती. गर्दीतून चालत असताना कुणीतरी मला मागून स्पर्श करत असल्याची जाणीव झाली. सुरुवातील मी दुर्लक्ष केले मात्र पुन्हा एकदा स्पर्श होत असल्याचे मला जाणवलं.

- Advertisement -

तापसीने ज्याप्रकारे नाम शबाना आणि बेबी चित्रपटात जबरदस्त फायटींग सीन केले होते. त्याप्रमाणे ती खऱ्या आयुष्यात देखील नीडर आणि बिनधास्त भीडस्त स्वभाव असणारी आहे. तापसीने गुरुद्वारात मागून स्पर्श करणाऱ्या व्यक्तीचा हात पकडून त्याची बोटं पिरगळून टाकली होती. ज्यामुळे त्या व्यक्तीला कायमचा धडा मिळेल. तापसीने आठवण सांगितलेल्या या भागाचे प्रसारण एफएम १०४.८ वर होणार आहे.

तापसी पन्नू ही लवकरच भारतीय महिला क्रिकेटपटू मीथाली राजच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘शाब्बास मिथू’, असे या चित्रपटाचे नाव आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -