घरमनोरंजन...म्हणून अमिताभ बच्चन यांच्या घराचे नाव 'प्रतीक्षा' आहे

…म्हणून अमिताभ बच्चन यांच्या घराचे नाव ‘प्रतीक्षा’ आहे

Subscribe

शुक्रवारी कौन बनेगा करोडपतीच्या भागामध्ये आपल्या बंगल्याचे नाव प्रतीक्षा कसे ठेवले गेले याचा बिग बि यांनी खुलासा केला.

अमिताभ बच्चन( amitabh bachchan) हे त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे सतत चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची बोलण्याची शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर स्पर्धकांना बिग बींची (amitabh bachchan) नम्रता आवडते त्याच बरोबर सेलिब्रिटींच्या आयुष्यातील काही किस्से किंवा गोष्टी ऐकायला प्रत्येकालाच आवडते. अमिताभ बच्चन सुद्धा प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी मोकळेपणाने प्रेक्षकांसोबत शेअर करतात. त्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक असतात. शुक्रवारी कौन बनेगा करोडपतीच्या भागामध्ये आपल्या बंगल्याचे नाव प्रतीक्षा कसे ठेवले गेले याचा बिग बि यांनी खुलासा केला.

हे ही वाचा – प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्यात ‘या’ 8 प्रकारच्या साड्या

- Advertisement -

शुक्रवारी प्रसारित झालेल्या भागात 21 वर्षीय सीए असेलला स्पर्धक प्राक्यथ शेट्टी बिग बीं यांच्या समोर हॉट सीटवर बसला होता. सोबत आलेल्या त्याच्या बहिणीशी प्राक्यथ शेट्टीने बिग बि यांच्याशी ओळख करून दिली. प्रतिक्षा या स्पर्धकाच्या बहिणीचे नाव होते. यावर अमिताभ बच्चन यांनी असेही सांगितले की, त्यांच्या मुंबईत असलेल्या घराचे नाव देखील प्रतीक्षा(pratiksha) आहे. ते म्हणाले की हे नाव खूप गोंडस आहे आणि बाबूजी (हरिवंशराय बच्चन) यांना ते खूप आवडले होते.

हे ही वाचा –  ‘एखादी गोष्ट खटकत असेल तर अनफॉलो करा’ ऐश्वर्या नारकर यांचं ट्रॉलर्सना चोख उत्तर

- Advertisement -

याच संदर्भांत अमिताभ बच्चन ( amitabh bachchan) पुढे म्हणतात, ‘लोक मला विचारतात की तुम्ही तुमच्या घराचे नाव प्रतीक्षा का ठेवले? तेव्हा मी त्यांना सांगतो की ते मी निवडले नाही, माझ्या वडिलांनी ते निवडले आहे. म्हणूनच मी माझ्या वडिलांना विचारले की तुम्ही प्रतीक्षा हे नाव का ठेवले, त्यांची एक कविता आहे जिथे एक ओळ आहे की ‘इथे सर्वांचे स्वागत आहे, कोणीही कोणाची वाट पाहत नाही’ डॉ.हरिवंशराय बच्चन यांचा उल्लेख करून अमिताभ बच्चनही थोडे भावूक झाले.

हे ही वाचा – वाढदिवसानिमित्त शाहरुख खानचा मोदींसाठी खास संदेश; ट्वीटने वेधले चाहत्यांचे लक्ष

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -