घरमनोरंजन'एखादी गोष्ट खटकत असेल तर अनफॉलो करा' ऐश्वर्या नारकर यांचं ट्रॉलर्सना चोख...

‘एखादी गोष्ट खटकत असेल तर अनफॉलो करा’ ऐश्वर्या नारकर यांचं ट्रॉलर्सना चोख उत्तर

Subscribe

एका रीलमुळे ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल करण्यात आले होते त्याच संदर्भांत त्यांनी ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे.

मराठी आणि हिंदी मालिका त्याचसोबत मराठी चित्रपटांमधून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर(marathi actress aishwarya narkar) यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या नारकर एक आहेत. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण एका रीलमुळे ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल करण्यात आले होते त्याच संदर्भांत त्यांनी ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे.

हे ही वाचा – आलिया भट्टचं होणार ग्रँड बेबी शॉवर; पण पार्टीत फक्त महिलांनाच एन्ट्री

- Advertisement -

ट्रोलिंग संदर्भात बोलताना ऐश्वर्या नारकर(aishwarya narkar) यांनी स्पष्ट मत मांडलं. एक मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या सोशल मीडिया बद्दलही बोलल्या, ऐश्वर्या नारकर यांनी ‘सोयरे सकळ’ नाटकानंतर इन्स्टाग्रामवर त्यांचं अकाऊंट तयार केलं. सुरुवातीला मी हातात असतील तसे फोटो अपलोड करायचे. आता, ‘कोलॅब’मध्ये मी बऱ्याच गोष्टी करते, विशेषत: साड्यांसाठी. मुळात मला साडी अतिशय आवडते. ती मला छान कॅरी सुद्धा करता येते. कोलॅबमुळे साड्यांचे फोटोशूट होतात. श्रद्धा, आशय, श्रुती, दीपाली यांच्याबरोबर मी हे फोटोशूट केले आहे. एका वेळी फोटोशूट केलं की त्याचे किमान ५०० तरी फोटो असतात. मग त्यापैकी निवडक मी सोशल मीडियावर अपलोड करते. सोशल मीडियावर ठरवून सक्रिय राहणं असं काही नाही. तुम्ही नीट पाहिलं तर माझ्या पोस्ट कुठल्याही प्रोजेक्टसंदर्भात नसतात किंवा त्या काही खासगीही पोस्ट सुद्धा नसतात’, असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

- Advertisement -

हे ही वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नव्या तारक मेहताची एन्ट्री

‘मध्यंतरी मी काही रील्स नऊवारी साडी नेसून केल्या होत्या. 1-2 रील करताना त्यात मी डोळा मारल्याचं दाखवलं होतं. तेव्हा अनेकांचं म्हणणं होतं, हे तुमच्या वयाला शोभतं का? अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मला येत होत्या. असं ऐश्वर्या नारकर म्हणालया. तुम्हाला जर एखादी गोष्ट खटकत असेल तर अनफॉलो करा, इतकं सोपं आहे. ते जबरदस्ती पाहण्याची आवश्यकता नाही. हे कुठेतरी थांबायला हवी. सोशल मीडियाचा अशा पद्धतीनं कुणीही वापर करू नये. फार झालं तर मी अशा लोकांना सरळ ब्लॉक करून टाकते.’ असं म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं.

हे ही वाचा – ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील तेजस्वीचा फर्स्ट लूक रिलीज

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -