घरताज्या घडामोडी'जयंती'च्या प्रमोशनसाठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरून प्रवास

‘जयंती’च्या प्रमोशनसाठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरून प्रवास

Subscribe

'जयंती'च्या पोस्टर आणि टिझर ने तसेच चित्रपटाच्या एकूण विषयाच्या प्रेमात असलेला हा तरुण

अनेक चित्रपट प्रदर्शित होतात आणि प्रत्येक चित्रपटाचे प्रोमोशनही तितक्याच दमदार पद्धतीने होत असते.सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्याला एका क्लिकवर आपल्याला समजत आहे. पण आजही काही ठिकाणं अशी आहेत जिथे पारंपरिक पद्धतीच्या जाहिरातबाजीने प्रभाव अधिक प्रखरतेने पडताना आपण पाहतो. १२ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणाऱ्या ‘जयंती’ या सिनेमाबद्दल काहीसं असच म्हणावं लागेल. चित्रपटाच्या नावावर आणि टिझर च्या प्रेमात असलेल्या एका युवकाने चक्क या चित्रपटाचं प्रोमोशन एक वेगळ्या अंदाजात करण्याची ईच्छा सिनेमाच्या दिग्दर्शकांसमोर ठेवली आणि त्याची ही ईच्छा ऐकून जयंती ची संपूर्ण टीम आवाक झाली.

चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी घेतली एका महिन्याची सुट्टी…

पूर्वी कोणत्याही चित्रपटाची, नाटकाची माहिती सांगण्यासाठी काही लोकं चालत, नंतर कालांतराने सायकल किंवा गाड्यांतून फिरत दवंडी देत त्या चित्रपटाबद्दल किंवा एखाद्या नाटकाबद्दल लोकांना माहिती द्यायचे आणि स्थानिक त्या ठरलेल्या वेळी एकत्र येऊन चित्रपट किंवा नाटक पहायचे. अगदी त्याचप्रमाणे शोएब नावाच्या तरुणाने दादर-चैत्यभूमी ते नागपूर-दीक्षाभूमी हा तब्बल ८३० किलोमीटर चे अंतर सायकल ने पार करून चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत ठरलेल्या ठिकाणांहून जात गावाच्या वेशीवर येत लोकांना याबद्दल सांगणार आहे. यासाठी शोएब ने त्याच्या कामावरून तब्बल एक महिन्याची सुट्टी घेतली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

कोण आहे ‘शोएब’ ? 

शोएब हा मुंबई येथील रहिवासी असून, एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये वर्कशॉप मॅनेजर या पदावर काम करत आहे. सोशल मीडियाद्वारे नुकताच जारी करण्यात आलेल्या जयंतीच्या पोस्टर आणि टिझर ने तसेच चित्रपटाच्या एकूण विषयाच्या प्रेमात असलेला हा तरुण आपणसुद्धा या चित्रपटाची प्रसिद्धी करावी हा विचार त्याच्या मनात आला.

याबद्दल शोएब सांगतो , “जयंती जसं याचं नाव जितकं हटके आहे तितक्या हटके पद्धतीने याची प्रसिद्धीदेखील झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना या चित्रपटाबद्दल समजावं आणि एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहचावा हे या सायकल राईड च उद्दिष्ट आहे.” याबद्दल आपले मत व्यक्त करताना दिग्दर्शक शैलेश नरवाडे सांगतात, “शोएब सारखे तरुण या चित्रपटाला प्रेक्षक म्हणून लाभले यातच सर्वकाही आलं. प्रदर्शनाआधीच आम्हाला सर्वच वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”


हे ही वाचा – १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘जयंती’


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -