घरमहाराष्ट्रनाशिकमांजरींच्या सुदृढ पिलांसाठी ‘कॅट फिन्सिअर्स’ चा पुढाकार

मांजरींच्या सुदृढ पिलांसाठी ‘कॅट फिन्सिअर्स’ चा पुढाकार

Subscribe

आंतरराष्ट्रीय मार्जार दिन विशेष-

भारतात मांजरींविषयीच्या जागृतीचा अभाव आहे. त्यातच काही व्यावसायिकांनी चुकीच्या पद्धतीने ब्रिडिंग करण्याचा धडाका लावल्याने चांगल्या जातीही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या जातीच्या मांजरीचे मेटिंग कोणत्या जातीशी करावे, ज्यामुळे सुदृढ पिलाचा जन्म होईल याविषयीची जनजागृती कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन ऑफ इंडियानच्या वतीने करण्तयात येणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्जार दिनाच्या पार्श्वभूमीवर मांजर प्रेमींसाठी ही बाब सुखावह ठरणारी आहे.

‘वाघाची मावशी’ च्या संवर्धनासाठी कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मांजर प्रजाती जतन करण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय मांजरींच्या संगोपनासाठीची जागृतीही असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे. यात मांजरींच्या प्रजातींची माहिती संकलीत करण्यात येणार असून ती आपल्या संकेतस्थळावर संस्था प्रसिद्ध करेल. मांजरींबरोबरच त्यांना पिले झाल्यानंतर त्याचीही नोंदणी या निमित्ताने होणार आहे. यासाठी मांजरीच्या मालकांना प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे.

- Advertisement -

नाशिककरांचा पुढाकार

मांजरींची काळजी, संगोपन आणि संवर्धनासाठी ११० वर्षांपासून जागतिक पातळीवर कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन ऑफ वर्ल्ड ही संस्था कार्यरत आहे. मार्जारसेवा करण्यात या संस्थेचे योगदान मोठे आहे. भारतात या कामासंदर्भात मोठी उदासीनता दिसते. ही बाब लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय संघटनेची परवानगी घेत नाशिकमधील अश्विन पंडित, राहुल चव्हाण, साकीत पठाण, समीर येवलेकर, अजिंक्य चोपडे, ऋषिकेश कोरडे या तरुणांनी भारतात कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सुरू केली. या कामासाठी संबंधित तरुणांना सुनील धोपावकर यांचा पाठिंबा मिळत आहे.

मांजरींच्या ४५ प्रजाती

अमेरिकन बॉबटेल, अमेरिकन शॉर्ट हेअर, बर्म्यान, बॉम्बे, ब्रिटीश शॉर्ट हेअर, कॉर्नीश रेक्स, इंजिप्शियन माऊ, एक्झॉटीक, ओरिएंटल, पर्शियन, रॅक डॉल, रशियन ब्लू, स्कॉटीश फोल्ड, सिव्हेरियन, टॉय बॉब, टर्किश व्हॅन, सायबेरियन, सिंगापूरा, सोमाली, ओसी कॅट आदी ४५ प्रकारच्या प्रजातींची माहिती सध्या असोसिएशनकडे संकलीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

न्यूटर मांजरींसाठी जागृती

भारतीय मादी मांजरींना शारीरिक व्याधी अधिक असतात. विशेषत: गर्भाशयाशी संबंधित तसेच लिंगाशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात असतात. असोसिएशनच्या अभ्यासानुसार मांजरीचे मेटींग वर्षातून दोन वेळेचा होणे आवश्यक असते; परंतु काही मंडळी आपल्या व्यवसायासाठी अधिक वेळा मेटिंग करून तिच्या आरोग्याशी खेळतात. ही बाब लक्षात घेऊन संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येते. इतकेच नाही तर मांजरींचे प्रजोत्पादनच करू नये, म्हणून संस्थेतर्फे जागृती करण्यात येणार आहे. प्रजोत्पादन बंद केल्यास मांजरीची प्रतिकारशक्ती वाढते. या दृष्टीने अशा ‘न्यूटर’ मांजरींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅट शो घेऊन त्यात मोठी बक्षिसे देण्याची संस्थेची योजना आहे.

मांजरींच्या सुदृढ पिलांसाठी ‘कॅट फिन्सिअर्स’ चा पुढाकार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -