घरफिचर्सउत्तर महाराष्ट्राचे दहा हजार कोटींचे नुकसान

उत्तर महाराष्ट्राचे दहा हजार कोटींचे नुकसान

Subscribe

जगभर थैमान घालणार्‍या करोना विषाणूच्या महामारीने उत्तर महाराष्ट्रातही आपले आस्तित्व दाखवून देण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यामार्गे प्रवेश केलेल्या या महामारीमुळे उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या पाच जिल्ह्यांपैकी जळगाव, नाशिक व नगर या तीन जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम केवळ नगर पुरत्याच मर्यादित वाटणार्‍या या महामारीने त्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात आपला प्रकोप दाखवण्यास प्रारंभ केला आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आपल्याकडे त्याची काय गरज आहे, असा विचार करून त्याबाबत नागरिकांना फारसे गांभीर्य नव्हते. मात्र, याच लॉकडाऊनच्या काळात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे पहिला रुग्ण सापडला आणि नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रवेश झाला. नाशिकप्रमाणेच जळगावलाही करोनाचा रुग्ण सापडल्याने तेथील परिस्थिती अधिक चिघळली आहे. आतापर्यंत या धुळे व नंदुरबार वगळता इतर तीन जिल्ह्यांमध्ये करोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वाधिक 27 रुग्ण नगर जिल्ह्यात असून त्यानंतर नाशिक जिल्ह्यात 12 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. जळगावमध्ये दोन रुग्ण सापडले असून जळगाव व नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचा विचार केल्यास त्यात मालेगाव शहरात नऊ रुग्ण, निफाड व चांदवड तालुक्यात एक रुग्ण व मालेगाव शहरात नऊ रुग्ण सापडले आहेत. केवळ दोन दिवसांमध्ये मालेगाव येथे 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक जिल्ह्यातील 90 संशयितांच्या घशाच्या स्त्रावांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहे. मालेगावमध्ये दोनच दिवसांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक झाल्याने मालेगाव शहरात या महामारीचा विस्फोट होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मुंबई आणि पुण्यात करोना महामारीचा प्रकोप सुरू झाला, तेव्हाच त्यांच्याबरोबर नगरचेही नाग येत होते. त्यात नगर व संगमनेर येथील रग्णांची संख्या इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. तसेच नगर जिल्ह्यात नगर हे शहर वगळता इतर लहान शहरांमध्ये याचे रुग्ण आढळले असल्याने तेथे या विषाणूच्या फैलावास अटकाव आणणेही तितकेच सोपे आहे. यामुळे महिनाभरापासून नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण सापडत असले तरी बृहन्मुंबई व पुण्याप्रमाणे येथे करोनाचा विस्फोट झालेला नाही. नाशिक जिल्ह्यातही पहिला रुग्ण लासलगाव येथे सापडला, त्याचे कनेक्शन नगर जिल्ह्याशी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिक शहर या महामारीपासून दूर राहणार असा प्रशासनासह सर्वांचाच कयास असताना नाशिकमधील अत्यंत उच्चभ्रू वस्तीमध्ये करोनाबाधित आढळल्याने नाशिकमध्ये धावपळ झाली आहे. त्यापाठोपाठ मालेगावमध्ये सलग दोन दिवसांत 9 रुग्ण आढळून एकाचा मृत्यूही झाल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे. नाशिकमध्ये आढळलेल्या रुग्णाच्या घराचा तीन किलोमीटर परिघातील परिसर सील करण्यात आला असून नाशिक शहरातही लॉकडाऊन अधिक सक्तीचे केले आहे. शहरातील भाजीपाला बाजारांवर निर्बंध आणून आठवड्यातून केवळ दोनच दिवस ते सुरू राहणार आहेत.

- Advertisement -

मालेगाव शहरातील लोकवस्ती अत्यंत दाटीवाटीची असून तेथे सलग दोन दिवसांमध्ये 9 रुग्ण वाढल्याने प्रशासनाने तेथील संचारबंदी अधिक सक्त केली असून शहरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी तीनशेवर आरोग्य पथकांची स्थापना केली आहे. मालेगावमधील दाट लोकवस्तीमुळे तेथे नागरिकांचे घरात बसून राहणे ही अवघड गोष्ट आहे. त्यामुळे सोशल वा फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात मोठ्या अडचणी येऊन करोना विषाणूचा संसर्ग रोखणे अवघड होणार आहे.

नाशिक व जळगाव जिल्ह्यातील उद्योग सोडले तर उत्तर महाराष्ट्रातील अर्थकारण हे बहुतांश शेतीवर अवलंबून आहे. नाशिक व जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील सहा हजार लहान-मोठे उद्योग 22 मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे या उद्योगांवर अवलंबून असलेले कामगार, कर्मचारी घरीच बसून असून या उद्योगांवर आधारीत इतर सेवा व्यवसायही ठप्प झाले आहेत. त्यातून उत्तर महाराष्ट्रातून शासनाला मिळणार्‍या महसुलाचा विचार करता किमान साडे तीन हजार कोटींचा फटका बसला आहे. विभागात नाशिक येथील प्रमुख पीक असलेले द्राक्षे, जळगावची केळी व नगरमधील ऊस पिकाला याला फटका बसला आहे. उसाचे कारखाने सुरुवातीच्या काळात बंद होते. मात्र, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेमुळे सध्या कारखाने बंस असल्याने तेथील ऊस गाळप ठप्प झाले आहे. नाशिकमधील द्राक्षांच्या निर्यातीला व देशांतर्गत बाजार पेठेंमध्ये विकल्या जाणार्‍या द्राक्षांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. निर्यात मंदावल्याने देशाचे साडे आठशे कोटींचे नुकसान झाले आहे, तर स्थानिक बाजार पेठेत विकल्या जाणार्याा द्राक्षांचे पंधराशे कोटींचे असे जवळपास 2300 कोटींचे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचा गहु, हरभरा, ज्वारी आादी रब्बीचा हंगाम पूर्ण झाला असून उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. उन्हाळ कांदा चाळींमध्ये सहा महिने टिकत असल्यामुळे त्याचे नुकसान होणार नसले तरी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे शहरांमधील ग्राहकांना पुरेसा भाजीपाला मिळत नसून शेतकर्‍यांना भाजीपाला विकण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. बाजार समित्यांमधील मंदावलेली आवक बघता भाजीपाला पिकांचे किमान हजार कोटींचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे.

- Advertisement -

चीनमध्ये करोनाचा हाहाकार उडाला तेव्हाच समाज माध्यमांवरील खोडसाळ बातम्यांचा परिणाम पोल्ट्ी उद्योगाला भोगावे लागले. ग्राहकांनी ब्रॉयलर कोंबड्या खाणे बंद केल्याने फेब्रवारी महिन्यातच पोल्ट्री उद्योग पूर्णपणे झोपला. त्यातून या व्यवसायावर अवबलूंन असलेल्या हजारो शेतकरी व व्यावसायिकांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका दुग्धउत्पादन व्यवसायालाही बसला आहे. दूध उत्पादक संघांनी दुधाचे दर घटवले असून शहरांमध्ये पिशव्यांमधील दूध खरेदीकडे हात आखडता घेतल्याने पिशव्यांमधील दुधाची विक्री 40 टक्क्यांनी घटली आहे. शहरांमधील मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. यातून उत्तर महाराष्ट्राचे जवळपास दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

लॉकडाऊन वाढल्यास
लॉकडाऊन वाढल्यास व मालेगावसह इतर ठिकाणी करोना रुग्णांची संख्या वाढल्यास उद्योग सुरू होण्यावरील निर्बंध आणखी कडक होतील. सध्या शासनाने कृषी प्रक्रिया व पॅकेजिंग उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी इतर उद्योगांना परवानगी मिळणे अवघड आहे. लॉकडाऊनसाठी भिलवाडा पॅटर्न राबवण्याबाबत सगळीकडे दबाव वाढत आहे. तसे झाल्यास दूध, भाजीपाला, फळे यांच्या विक्रीवर परिणाम होऊन कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -