घरफिचर्सभारतीय भटपटातील आळशी भुते !

भारतीय भटपटातील आळशी भुते !

Subscribe

भारतीय भयपटात आपल्याला प्रयोगांची कमतरता नक्की जाणवते, म्हणजे आपल्याकडे भुतांच्या बाबतीत देखील ७० वर्षात फरक जाणवलेला नाही. आपल्याकडच्या भुतांना भावना आहेत, त्यांना फक्त रात्रीचे काम करता येते. दिवसा सगळी भुतं झोपलेली असतात, आपल्याकडे भुतं भयाण आळशी आहेत, म्हणजे का मारायचं किंवा काय अपूर्ण इच्छा आहे हे सांगायला ते बराच वेळ लावतात. आपल्याकडच्या भुतांना फॅशनचा सेन्स नाही, चुडेल फक्त पांढरेच कपडे वापरते, आपल्याला भुतांपेक्षा दरवाजा, ग्लास अन् काच फुटलेल्या आवाजाची अधिक भीती वाटते.

शाळेत प्रत्येक विषयात हुशार असणारा विद्यार्थी कदाचितच सापडतो. गणितात हुशार असलेल्या मुलाला समाजशास्त्र कळतचं असं नाही, पण परीक्षेत पास व्हायचं असेल तर फक्त गणिताचा अभ्यास करून चालणार नाही. येत नसेल तरी पासिंग पुरता समाजशास्त्राचा अभ्यास हा करावाच लागेल, अन्यथा विद्यार्थी परीक्षेत नापास होईल. पण प्रत्येकवेळी समाजशास्त्राचा अभ्यास करताना त्या विद्यार्थ्याची तुलना गणिताशी केली जात असेल तर सिनेसृष्टीच्या उगमानंतर विविध जॉनरचे सिनेमे भारतात तयार करण्यात आले आहेत, त्यात अनेक जॉनर्स लोकप्रिय ठरले तर काही जॉनर्स नापास झाले. भयपट हा त्या पैकीच एक, सिनेमाचा हा प्रकार आपल्याकडे १९४० पासून अस्तित्वात आहे.

“खुनी” सिनेमापासून भारतात भयपट निर्मितीला सुरुवात झाली, पण भयपट म्हणून एकंदरीत दर्जा पाहता या प्रकारात अपेक्षित यश आजवर भारतीय सिनेसृष्टीला मिळालेलं नाही. आता मुद्दा हा की जसं समाजशास्त्र अवघड जातं म्हणून त्या विषयाचा अभ्यासच न करता नापास होणारा विद्यार्थी हा त्याच्या प्रगतीला जबाबदार की, प्रत्येकवेळी समाजशास्त्राची तुलना गणिताशी करणारे जबाबदार? अगदी तसंच भयपटांच्या दर्जाला प्रयोगांची कमतरता जबाबदार की प्रत्येकवेळी होणारी हॉलिवूड सोबत तुलना जबाबदार याच बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

भारतीय भयपटात आपल्याला प्रयोगांची कमतरता नक्की जाणवते, म्हणजे आपल्याकडे भुतांच्या बाबतीत देखील ७० वर्षात फरक जाणवलेला नाही. आपल्याकडच्या भुतांना भावना आहेत, त्यांना फक्त रात्रीचे काम करता येते. दिवसा सगळी भुतं झोपलेली असतात, आपल्याकडे भुतं भयाण आळशी आहेत, म्हणजे का मारायचं किंवा काय अपूर्ण इच्छा आहे हे सांगायला ते बराच वेळ लावतात. आपल्याकडच्या भुतांना फॅशनचा सेन्स नाही, चुडेल फक्त पांढरेच कपडे वापरते, आपल्याला भुतांपेक्षा दरवाजा, ग्लास अन् काच फुटलेल्या आवाजाची अधिक भीती वाटते. आपल्याकडची भुतं ५०० वर्षांची नसतात ती अगदीच तरुण असतात. आपल्याकडं भुतांना बंदूक, तोफ यापेक्षा मंत्र अन् भस्माची भीती वाटते.

गेल्या ७० वर्षांपासून हेच सर्व भयपटांच्या बाबतीत घडत असल्याने आपल्याकडे या क्षेत्रात प्रयोगांची कमतरता जाणवते. रामसे बंधूंच्या सिनेमात असलेली भुतं अजूनही त्याच त्याच रंगात समोर आणली जातात. नुकताच प्रदर्शित झालेला भूत सिनेमादेखील असाच काहीसा भासतो. उत्तम तंत्रज्ञान, कॅमेरा आणि स्क्रिप्ट असताना शेवटी पुन्हा तंत्रमंत्राचा वापर करून भूत पाठविण्याच्या सीन्समुळे सिनेमा बालिश वाटतो. धाडकन येणारे आवाज अन् हीही करून हसणं या पलीकडे घाबरविण्यासाठीच दुसरं तंत्रच बहुधा अजून बॉलीवूडला गवसले नाही. सोबतच हॉलिवूडमध्ये चांगले हॉरर सिनेमे बनतात म्हणून त्यांच्याकडून शिकून घेण्यापेक्षा कॉपी करून चित्रपट बनविण्याच्या नादात काहीतरी भलतचं बनविण्याचा अट्टाहास हासुध्दा दर्जेदार भयपटांच्या न होणार्‍या निर्मितीला जबाबदार आहे.

- Advertisement -

शाळेत काहीच न येणार्‍या मुलाची तुलना नेहमीच वर्गातल्या हुशार मुलाशी केली जाते. मग त्या ढ मुलाला पासिंग पुरते मार्क्स आणून फायदा नसतो, कारण तुलना होणार असते वर्गातील टॉपर सोबत.. पण जेव्हा वर्गात कुणीच टॉपर बनलेला नसतो त्यावेळी तुलना होते का ? म्हणजे झपाटलेला सिनेमा पाहून किंवा पुराना मंदिर सिनेमा पाहून रात्ररात्र न झोपणार्‍या लोकांसाठी ते सिनेमे उत्तम भयपट होतेच की, कारण त्या काळात त्यांनी त्यापेक्षा उत्तम काही पाहिलेलं नव्हतं. पण आजच्या एखाद्या लहान मुलाला जर झपाटलेला सिनेमा दाखवला तर तो हसेल कारण त्याने काँजरिंग बघितलाय, हॉलिवुड आपल्या मोबाईलपर्यंत येऊन पोहचल्यानंतर त्यांच्याशी तुलना होणे साहजिक आहे. ज्यावेळी आपल्याकडे भयपट बनले जायचे त्यावेळी हॉलिवूड आपल्यापर्यंत पोहचलं नव्हतं, पण नंतरच्या काळात जेव्हा ते आपल्यापर्यंत पोहचलं आणि आपण अनेक दर्जेदार भयपट पाहू लागलो त्या नंतर तुलना वाढली. अशावेळी चांगले भयपटदेखील तुलनेमुळे मागे राहीले.

हॉलिवूडने हॉरर सिनेमांत स्वतः चे एक स्टँडर्ड सेट केले आहे, अशावेळी भारतीय भयपटाची त्यांच्याशी तुलना होणे साहजिक आहे. पण मुद्दा आहे की या तुलनेतून आपण काय शिकतो ? तंत्रज्ञानात झालेले बदल, उपलब्ध साधनसामुग्रीत झालेली वाढ विरुद्ध प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा यात जिंकतं कोण हे पाहावं लागेल.

भारतात भयपट हा प्रकार खुनी सिनेमानंतर अस्तित्वात आला, नंतरच्या काळात रामसे बंधूनी या प्रकाराला लोकांपर्यंत पोहचवले आणि लोकप्रिय बनवले. त्यांच्या सिनेमांचे जे वैशिष्ठ्य होतं ते लोकांना आवडलं, म्हणजे त्याकाळात ज्या लोकांकडे हॉलिवूड अव्हेलेबल होते ती लोकंसुद्धा रामसे बंधूचे सिनेमे पाहायचे. रामसे बंधूंनंतर नव्याने आलेल्या अनेक भयपट दिग्दर्शकांनी सिनेमा बनवताना तोच रामसे पॅटर्न वापरल्याने त्यांना तेवढे यश मिळाले नाही, नंतरच्या काळात मात्र वेगळे प्रयोग करणार्‍यांची संख्या वाढल्याने थोडा बदल भयपटात झालेला पाहायला मिळाला. नजीकच्या काळात आपल्याकडे काही चांगले भयपट आले होते, पण हॉलिवूडशी केलेल्या तुलनेने ते सिनेमे मागे राहिले.

हॉलिवूडमध्ये १८९६ पासून भयपट हा प्रकार अस्तित्वात आहे, म्हणून दर्जा आणि तंत्रज्ञानात फरक असणे साहजिक आहे. हॉलिवूडमध्ये द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स, रोजमेरीज बेबी, द कॅबिनेट ऑफ डॉकटर कॅलिगरी, सायको, द थिंग आणि द शायनिंग सारखे अनेक उत्तम भयपट २००० च्या आधी प्रदर्शित झाले होते. म्हणजे जेव्हा उच्च दर्जाचे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते तेव्हा देखील चांगल्या कलाकृती हॉलिवूडमध्ये निर्माण होत होत्या, तुलनेने भारतात याचे प्रमाण कमी आहे. पारंपरिक पद्धतीने भारतात जर भयपटांची निर्मिती अशाच प्रकारे सुरू राहिली तर हॉलीवूडसोबत तुलनादेखील होतंच राहील, मग याला पर्याय काय ? साधा उपाय काहीतरी हटके पर्याय लोकांसमोर आणायचा. स्त्रीसारखे प्रयोग जर पुन्हापुन्हा केले गेले तर लोकांचा त्याला प्रतिसाद नक्की मिळेल. हॉरर कॉमेडी हा प्रकार भारतीय प्रेक्षकांना आवडतो, जर स्त्रीसारखे प्रयोग वारंवार केले गेले, तर त्यांच्याकडे वळणारा प्रेक्षक वाढेल.असे सिनेमे बनवायचे दोन फायदे असतात पहिला म्हणजे तुलना होत नाही आणि दुसरा म्हणजे लोकांचा प्रतिसाद मिळतो. येणार्‍या काळात तरी अशा प्रयोगांची संख्या वाढेल आणि चांगले हॉरर सिनेमे आपल्याला पाहायला मिळतील इतकी अपेक्षा.

-अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -