घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअशा सत्कार सोहोळ्यांची गरज आहे का?

अशा सत्कार सोहोळ्यांची गरज आहे का?

Subscribe

१६ एप्रिल… आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार म्हणून सत्कार सोहळा… लाखों लोकांच्या समोर साजरा करण्याची गरज होतीच का??
मुळीच नाही…
आज मी माझे परखड विचार मांडते आहे… सत्य नेहमी कटू असते…
हा सत्कार सोहळा फक्त मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा नक्कीच होऊ शकला असता. येथे श्री सदस्यांना बोलवून काय साध्य करायचे होते?
जे खरंच समाजप्रबोधनाचे कार्य करतात, त्यांना समाजाला काय दाखवायचं होते?
अशी कितीतरी माणसं तळमळीने रस्त्यावर उतरून तळागाळातील समाजासाठी कार्य करतात त्यांना कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा नसतेच. दिखावूपणाही नसतो.
१० वर्षं झाली असतील… मी कुतुहलापोटी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार सोहळ्यास गेली होती. (नवी मुंबई) त्यावेळीही अफाट गर्दी होती. आम्ही मैदानात बसलो होतो. ऊन मी म्हणत होते. खाली बसण्यासाठी काहीच नाही. सत्कारमूर्ती व मान्यवर उशिरा आले. आले ते हेलिकॉप्टरने!! त्यावेळी मनात विचार आला की, जनसमुदाय तळपत्या उन्हात बसला आहे आणि मान्यवर मंडपाच्या छत्र सावलीत? व्वा मस्तच!!!
पण यावेळी बसण्यासाठी खुर्च्यांची सोय… एवढाच काय तो फरक.
जे समाजप्रबोधनाचे कार्य करतात, त्यांना या समाजाची काळजी आहे का?
उत्तर नाही…
कारण असे कार्यक्रम आयोजित करताना सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.
१) सरकारचा पैसा वाया..
हाच पैसा गरीब अनाथ मुलांच्या खाण्यासाठी व शिक्षणासाठी उपयोगी आला असता का?
२) लोकांचे हाल होतील. उन्हाळा सुरू आहे. जनसमुदाय तळपत्या उन्हात कसा बसेल? काय खाईल?
अशा अनेक गोष्टी… पण याचा विचार करणार कोण? जे खरंच समाजप्रबोधनाचे कार्य करतात त्यांना हा विचार कसा पडला नाही, हे नवलच?
माणसे उष्माघाताने तडफडून मेली. “याला जबाबदार कोण?”
आंधळ्यासारखा विश्वास ठेवणारा, न विचार करता धावत सुटणारा जनसमुदाय? की अजून कोणी? ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते?
ज्यांच्यासाठी आयोजित केला ते?
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हे वाक्य फक्त श्रवणासाठीच आहे का?

– मयुरा म्हात्रे अनगत
शिक्षिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -