घरफिचर्सक्रांतिकारक दामोदर चाफेकर

क्रांतिकारक दामोदर चाफेकर

Subscribe

तिन्ही भावांना ‘चाफेकर बंधू’ नावाने ओळखले जाते. त्यांचे वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यामुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.

दामोदर हरिभाऊ चाफेकर हे थोर क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी झाला. लहानपणापासूनच लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रांना संघटित करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली. इंग्रजांकडून करण्यात येणार्‍या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चाफेकर व वासुदेव हरि चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत होते. या तिन्ही भावांना ‘चाफेकर बंधू’ नावाने ओळखले जाते. त्यांचे वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यामुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. (Revolutionary Damodar Chafekar)

पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेग पीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोधमोहीम उघडली आणि अत्याचाराचा कहर केला. यामुळे इंग्रजांविरोधात असंतोष पसरू लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी वाल्टर चार्ल्स रँड हा अत्यंत क्रूर, खूनशी होता. पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात तो सर्वात पुढे होता. टिळक आणि आगरकर यांनी या अत्याचाराविरोधात टीका केली. यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. दरम्यान, दामोदरपंतांनी रँडची हत्या करण्याची योजना आखली.

- Advertisement -

हेही वाचा – बंड हिंदुत्वासाठी की महत्वाकांक्षेसाठी ..?

२२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत रँड आणि त्याचा सहकारी लेफ्टनंट आयस्टर यांची एका कार्यक्रमाहून परतत असताना गोळ्या झाडून हत्या केली. गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांना हल्लेखोरांची नावे समजली आणि त्यांनी दमोदरपंतांना अटक केली. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना ८ मे १८९९ रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि महादेव रानडे यांना १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -