घरफिचर्ससारांशआणि लग्नाच्या पडद्यामागील गोष्ट!

आणि लग्नाच्या पडद्यामागील गोष्ट!

Subscribe

लग्न ही काय जबाबदारी नाही. हे तर पवित्र बंधन आहे, जे सात जन्माचं मानलं जातं. ते सात जन्मापर्यंत निभावलं जातं. मग तुम्हीच विचार करा, सात जन्माचं नातं काय एका दिवसात एकमेकांना पाहून ठरवलं जात असतं काय? फक्त दिसण्यावरून होत असतं काय? मला आजही ही प्रथा आवडत नाही. भलेही तुम्ही कोणत्याही प्रकारे लग्न करा (Arrange Marriage or Love Marriage) पण ज्या दोघांना जन्मोजन्मी राहायचं, त्यांना तर एकमेकांसाठी एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी वेळ द्या.

–संकेत शिंदे

लग्न ही एक अशी गोष्ट आहे, जी दोन माणसांना जीवनभर सोबतीने टिकवते. प्रेमाने, मायेने, चिंतेने, चिंतनाने, नवीन योग्य विचाराने ही गोष्ट सांभाळावी लागते. या गोष्टीला अर्थपूर्णतेचा विचार दिला जातो आणि तोच विचार आयुष्यभर सोबतीने पाळला जातो, निभावला जातो.

- Advertisement -

लग्न ही काय जबाबदारी नाही. हे तर पवित्र बंधन आहे, जे सात जन्माचं मानलं जातं. ते सात जन्मापर्यंत निभावलं जातं. मग तुम्हीच विचार करा सात जन्माचं नातं काय एका दिवसात एकमेकांना पाहून ठरवलं जात असतं काय? फक्त दिसण्यावरून होत असतं काय? मला आजही ही प्रथा आवडत नाही. भलेही तुम्ही कोणत्याही प्रकारे लग्न करा (Arrange Marriage or Love Marriage) पण ज्या दोघांना जन्मोजन्मी राहायचं त्यांना तर एकमेकांसाठी एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी वेळ द्या. का सगळं मोठी माणसे, घरचेच लोक ठरवतील काय? त्या भेटीसाठी कदाचित तो मुलगा व ती मुलगी चांगली वागणूक वर्तवते, पण पुढे अशीच वागवणूक तो वा ती ठेवेल काय याची काय खात्री? जोपर्यंत मुलाला आणि मुलीला एकमेकांचे विचार पटत नाहीत, जोपर्यंत त्यांना त्यांचे अर्थपूर्ण आयुष्य दिसत नाही, तोपर्यंत ते तरी कसे राजी होतील?

आपण विचार नंतर पाहतो, कधी तर पाहतही नाही. पहिलं पाहतो तर काय बंगला चांगला आहे का? गाडी आहे का? पोरगं चांगल्या नोकरीला आहे का? पोराला पगार चांगला आहे का? जमीन किती आहे? मग जातो आपण सासूच्या स्वभावाकडे. मग मुलीला काय काय येतं, स्वयंपाक वगैरे. झालं, पोरगी दिसायला छान, सुगरण आहे, दिसायला दिसते संस्कारी, पोरगं नोकरीला आहे, बाकी जमीन, बंगला-गाडी आहे, दिसायलाही छान आहे….मग जमतं की इथचं. मी म्हणत नाही की सुगरण, चांगले दिसणे गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नक्कीच लक्ष द्या या गोष्टींकडे, पण प्राधान्य हे त्यांच्या विचारांना द्या, एकमेकांच्या विचारांच्या पसंतीला द्या, स्वभावाला द्या, पण यासाठी वेळ द्यावा लागतो, खरं काय ते समजून घ्यावं लागतं. बरोबर ना?

- Advertisement -

अहो, थांबा की, अजून तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशीभविष्य तर राहिलंच की, ते तर फारच कठीण आहे हा अपशकून, तो अपशकून ही अशीच निघेल, तो तसाच निघेल, कारण कुंडलीत दोष आहे, मग करा ही पूजा आणि करा ती पूजा. जर पूजा करूनही काही झालं नाही आणि जर काही अनर्थ ठरलं तर येतंच मग हिच्याचमुळे झालं नाहीतर त्याच्याचमुळे झालं. खरंच तुम्हाला वाटतं की ज्योतिषी लोकांना या आपल्या धरतीवरून हे तारे तुमच्यात अशी अडचण घालतील, तशी अडचण घालतील समजत असेल?

मी काही कुणाचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न करीत नाही, पण जे सत्य आहे तेच सांगतोय. अहो, हे तर माहीत आहे ना…! ” Everything Happens for a Reason यात कसा काय कुणाचा दोष असू शकतो मग? आणि कसं काय हे तारे, ग्रह आपल्या जीवनात अडचणी निर्माण करीत असतील? कधी विचार केला आहे का?

आपल्या विचारांच्या संसारात अडचणी निर्माण करणारा घटक म्हणजे या अंधश्रद्धा. खरंच खूप काही उद्ध्वस्त करून टाकतात या अंधश्रद्धा. या अंधश्रद्धा तर आहेतच, पण आपल्या समाजात सर्वात मोठी घोटवळणारी गोष्ट म्हणजे जात-धर्म, अगदी इतक्या प्रमाणात की जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा राहतो. आता जाती-धर्म या गोष्टी फक्त एका मुली- मुलाचं प्रेम यावरच दर्शवलं जात नाही, तर आपल्या या समाजाने एकजुटीने, एकतेने राहावं, समभाव धर्म राखावा यासाठी. प्रेम ही काय वाईट गोष्ट नाही आणि प्रेम जात-धर्म पाहूनच करावं असं तर बिलकुल नाही.

हे खरं आहे की, प्रेमाच्या नावाने आज तरुण मुले-मुली भरकटत आहेत, वाया जात आहेत, पण प्रेम हे विवेकीदेखील असू शकतं. आपल्या समाजात भलत्याच प्रेमाच्या व्याख्या आहेत, पण खरं प्रेम किंवा विवेकी प्रेम हे कुणी जाणून घेण्याचा प्रयत्नच करीत नाही. खर्‍या प्रेमात विचार समजून घ्यावे लागतात, एकमेकांचा स्वभाव समजून घ्यावा लागतो. त्या प्रेमाला अर्थपूर्ण जगवण्यासाठी अर्थपूर्ण अशा सोबतीची शपथ अशी सादगी निभवावी लागते. नुसतं रंगरूप पाहून जमत नसतं. जसं झटक्यात लग्न जमवली जातात. हे भलतंच किंवा टाईमपास चालणारं प्रेम आणि झटक्यात लग्न यात फरक काय राहील मग? अर्थपूर्ण विचार द्या प्रेमाला, तुमच्या साथीला, सोबतीला, मग जीवनातही अर्थपूर्णता लाभेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -