घरफिचर्ससारांश‘सायबरमॅटिक्स’चा सिक्रेट राजमार्ग!

‘सायबरमॅटिक्स’चा सिक्रेट राजमार्ग!

Subscribe

‘सायबरमॅटिक्स’ ह्या शाखेची व्याप्ती खूप मोठी असून दिवसेंदिवस तिचा व्यापक विस्तार होत आहे. संवाद आणि नियंत्रण या दोन गोष्टींवर केंद्रित असलेली ‘सायबरमॅटिक्स’ ही शाखा सायबर म्हणजे केवळ इंटरनेट वेबसाईटसाठी मर्यादित नाही. सायबरमॅटिक्स हे आता मोबाईल अ‍ॅप, ऑनलाईन आर्थिक व्यवहारांबरोबरच विविध देशांच्या ‘टॉप सिक्रेट मिशन्स’, एक्स फाईल आणि गोपनीयता बाळगणे आवश्यक आहे अशा सर्व बाबींसाठी जगातील १९५ देशांत अतिशय महत्त्वाचा प्रक्रिया किंवा ‘टेक्नोलॉजीकल प्रोसेस’ आहे ती म्हणजे सायबरमॅटिक्स.

–प्रा. किरणकुमार जोहरे

राजकारणात राजकीय व्यक्ती काय निर्णय घेऊ शकते आणि त्याचे काय परिणाम होतील याबाबत चर्चा सर्वत्र होते, मात्र राजकीय नेत्यांना निवडून देण्यासाठी आम जनता काय विचार करते आणि इलेक्शनमध्ये आपण विजयी होऊ की नाही आणि निवडणूक हरणार असू तर काय केले तर निवडणूक जिंकता येईल हेदेखील कमी खर्चात आधीच सांगणारी कोणती यंत्रणा असेल तर ती म्हणजे सायबरमॅटिक्स होय. सायबरमॅटिक्सचे हे सिक्रेट पाश्चिमात्य आणि युरोपियन अगदी सहज वापरत ‘माईंडगेम’ होतो हे जनतेलादेखील माहिती नाही. तसेच भारतातील ‘सुसंस्कृत’ राजकारणात ‘सायबरमॅटिक्स’ उपयुक्त आहे याची खरंतर राजकीय पक्षांना कल्पना नाही.

- Advertisement -

तंत्रज्ञानाबाबत अडाणी-अशिक्षित असलेले आपले भोळ्याभाबड्या व गरीब बिचारे राजकीय नेतेदेखील जगात मागे पडतात. कारण गेमचेंजर ‘सायबरमॅटिक्स’ असे काहीतरी आहे याची भनकदेखील त्यांना आतापर्यंत कुणी लागू दिली नाही ही मोठी गंमत म्हणावी लागेल. मीडिया हाऊस आणि वृत्तपत्र तसेच टीव्ही चॅनेलवर कोणती बातमी कोणत्या अँगलने किती वेळ कोणत्या कालावधीत प्रस्तुत केली तर तिचा इम्पॅक्ट आणि इंप्रेशन जबरदस्त होईल हे सांगण्यासाठी आज सायबरमॅटिक्स हे अनुभवी व शिकाऊ अल्लाउद्दीनचा जणू चिराग बनत आहे.

‘सायबरमॅटिक्स वॉरियर्स’ आज जगाचा चेहरामोहरा बदलून जीवन सुंदर व सुरक्षित बनविण्यासाठी अष्टौप्रहर झटत आहेत याची कल्पनादेखील सामान्य माणसाला नसते. आपली वेबसाईट हॅक किंवा क्रॅक झाली तर संस्थेचे किती आणि कसे नुकसान होईल, तसे झाले तर आपल्याकडे प्लॅन बी आणि सी काय असेल, आर्थिक नुकसान, वेळेचा अपव्यय, बिझनेस कॉम्पिटेटर किंवा ब्रॅण्ड खराब झाला तर शेअर मार्केटवरील ‘डिप इम्पॅक्ट’ तसेच शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म होणारे परिणाम याबाबत खातरजमा व चाचपणी करते. समजा सायबर अ‍ॅटॅक झालाच तर नुकसानभरपाई कशी करणार अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करीत आधीच काळजी घेणे यासाठी संगणक विज्ञानाची जी शाखा आहे, तिचे नाव आहे ‘सायबरमॅटिक्स.’

- Advertisement -

फायदेशीर व्याप्ती!

‘सायबरमॅटिक्स’ ह्या शाखेची व्याप्ती खूप मोठी असून दिवसेंदिवस तिचा व्यापक विस्तार होत आहे. संवाद आणि नियंत्रण या दोन गोष्टींवर केंद्रित असलेली ‘सायबरमॅटिक्स’ ही शाखा सायबर म्हणजे केवळ इंटरनेट वेबसाईटसाठी मर्यादित नाही. सायबरमॅटिक्स हे आता मोबाईल अ‍ॅप, ऑनलाईन आर्थिक व्यवहारांबरोबरच विविध देशांच्या ‘टॉप सिक्रेट मिशन्स’, एक्स फाईल आणि गोपनीयता बाळगणे आवश्यक आहे अशा सर्व बाबींसाठी जगातील १९५ देशांत अतिशय महत्त्वाचा प्रक्रिया किंवा ‘टेक्नोलॉजीकल प्रोसेस’ आहे ती म्हणजे सायबरमॅटिक्स! दोन किंवा अधिक कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये इंटरफेस डिझाईन करण्यासाठीदेखील सायबरमॅटिक्स गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, संशोधन, व्यवसाय व्यवस्थापन, शेअर मार्केट तसेच सामाजिक किंवा मानव्य शाखेबरोबरच वेबसाईट डिझाईन, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डिझाईन, बांधकाम, उद्योगधंदे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मार्केटिंग आदी सर्वच क्षेत्रांत विकास साधण्यासाठी सायबरमॅटिक्स अत्यंत लाभदायी, धनदायी, फलदायी आहे. बिझनेसमध्ये आपत्कालीन किंवा आपत्ती परिस्थितीमध्ये कोणत्या वेळी काय निर्णय घ्यावेत यासाठी सायबरमॅटिक्स उपयुक्त आहे.

‘सायबरमॅटिक्स’चा उगम

अस्थिर परिस्थितीमध्येदेखील एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवत ती गोष्ट चालू ठेवत पुढे नेणारे असे गव्हर्नर, पायलट, सरकार यासाठी वापरल्या जाणार्‍या ग्रीक शब्दावरून ‘सायबरमॅटिक्स’चा उगम झाला. १९४८ साली सर्वप्रथम नॉर्बर्टविनर यांनी ‘सायबरमॅटिक्स’ या शब्दाला आपल्या पुस्तकात जन्म दिला. प्राणी आणि यंत्रातील नियंत्रण आणि परस्पर संवादाचा अभ्यास म्हणून त्यांनी सायबरमॅटिक्स हा शब्द वापरला होता. आज परस्परांशी संवाद साधणार्‍या सजीव आणि निर्जीव वस्तूमात्रांची इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे आरोपी ही शाखा जगभर वेगाने फोफावत असताना त्याची संकल्पना बिजे ‘सायबरमॅटिक्स’शी जोडलेली आहे की काय अशी शंका आल्यावाचून राहत नाही. ‘सायबरमॅटिक्स’ ही शाखा विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ तसेच क्रिएटिव्ह डिझाईनर एकमेकांशी एकाच वेळी संवाद साधण्यासाठी एक नवी भाषा व प्लॅटफॉर्म प्रदान करते. मॅसी सायबरमॅटिक्स कॉन्फरन्समध्ये सायबरमॅटिक्स म्हणजे जैविक आणि सामाजिक प्रणालींमधील चक्राकार अभिप्राय म्हणजे फिडबॅक यंत्रणा असेही सांगितले गेले, तर मार्गारेट मीड यांनी सायबरमॅटिक्सच्या भूमिकेला इंटर किंवा क्रॉस-डिसिप्लिनरी विचारांचा एक प्रकार म्हणून जोर देत अनेक विषयांच्या सदस्यांना सर्वांना समजेल अशा भाषेत एकमेकांशी सहज संवाद साधणे शक्य करणारी शाखा म्हणजेच ‘सायबरमॅटिक्स’ असे म्हटले आहे.

संधींचे भविष्य!

कुठल्याही व्यवस्थेला व संस्थेला कार्यक्षम तसेच अधिकाधिक सुरक्षित बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर ‘सायबरमॅटिक्स’शिवाय पर्याय नाही. परिणामी असा एकही देश किंवा तंत्रज्ञान क्षेत्र नाही जिथे ‘सायबरमॅटिक्स वॉरियर्स’ची गरज नाही. अधिक कार्यक्षम आणि प्रभावी जग तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची अपेक्षा करू शकतो. सायबरमॅटिक्सचे भविष्य उज्ज्वल आहे आणि हे विज्ञान आणि मानवी समाजासाठी एक मोठे पाऊल आहे.

‘आयओबी’साठी सायबरमॅटिक्सचे महत्त्व

‘इंटरनेट ऑफ बिहेवियर’ अर्थात आयओबी या तंत्रज्ञान शाखेसाठी सायबरमॅटिक्सचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यंत्रे, वस्तू आणि त्यांच्याशी निगडित सजीवांमध्ये म्हणजे मनुष्य, प्राणी, पक्षी यांचे वर्तन कसे चालते आणि वर्तनात बदलाची तसेच प्रगती किंवा चुका दुरुस्त करता येईल हेदेखील सायबरमॅटिक्स सांगते. परिणामी एखादी संस्था प्रगतिपथावर नेण्यासाठी किती व कोणत्या कोणत्या संभावना आणि त्यासोबत येणार्‍या जोखिमा आहेत हे सायबरमॅटिक्सने स्पष्ट होते.

एआय आणि सायबरमॅटिक्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) सायबरमॅटिक्सची पावर लाखो पटीने वाढली आहे. रोबोट आणि कोबोट हे माणसांपेक्षा जास्त कार्यक्षम बनत अहोरात्र काम करण्यासाठीदेखील सायबरमॅटिक्स योगदान देत आहे. अत्यंत जटिल आणि किचकट प्रॉब्लेमवर ‘ओन्ली सोल्यूशन्स’ अशी सायबरमॅटिक्सची खुबी काय वर्णावी? ‘फिडबॅक’ घेत सर्वांगीण स्वयंचलित विचार करीत सायबरमॅटिक्स ही शाखा आज एआयसंगे अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. येत्या काळात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ‘सायबरमॅटिक्स’ शिकत भारतीय युवक-युवती आपल्या करियरला दिशा देत राष्ट्रीय उभारणीत योगदान करीत नवीन संधी निर्माण करतील हा विश्वास आहे.

–(लेखक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासकआहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -