घरफिचर्ससारांशक्यूआर कोड वापरताना सावधान!

क्यूआर कोड वापरताना सावधान!

Subscribe

क्यूआर म्हणजेच क्विक रिस्पॉन्स. हा स्कॅन करून पेमेंट करण्याचा लोकप्रिय पर्याय आहे. त्याचा वापर सर्रास केला जातो. दुकानदार बिल भरण्यासाठी याचा वापर करतात. अगदी लहान विक्रेतेसुद्धा त्यांच्या ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरण्याचा किंवा पेमेंट करण्याचा पर्याय देतात. क्यूआर कोड वापरून पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला लाभार्थी किंवा लाभार्थीच्या खात्याच्या तपशिलात जाण्याची गरज नाही आणि व्यवहाराचा बंदोबस्तदेखील जलद आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व बँकिंग आणि ई-वॉलेट अ‍ॅप्स क्यूआर कोड वाचन करण्याचे सॉफ्टवेअर प्रदान करतात. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ग्राहक रक्कम प्रविष्ट करतो आणि पासवर्ड प्रविष्ट करून पेमेंट प्रमाणित करतो आणि रक्कम लाभार्थीच्या खात्यात अगदी सहज हस्तांतरित केली जाते. एवढेच नाही तर ग्राहक क्यूआर कोड जनरेट करू शकतो आणि तृतीय पक्षाला पाठवू शकतो आणि त्या क्यूआर कोडमध्ये नमूद केलेली रक्कम स्वीकारू शकतो. अर्थात पेमेंट स्वीकारण्यासाठी पाठवता येते.

क्यूआर कोड फसवणुकीबद्दल…

१. क्यूआर स्कॅनिंग किंवा पेमेंट करण्यासाठी वापरला जातो, परंतु अनेक घटनांमध्ये असे आढळून आले आहे की फसवणूकदारांनी ते डिपॉझिट कन्फर्मेशन म्हणून सादर केले आहे. याची काही उदाहरणे : फसवणूक करणारे OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर वस्तू विकणार्‍यांशी संपर्क साधतात. यासाठी ते स्वत:ला सेकंड हँड वस्तू विक्रेते म्हणून दाखवतात आणि विक्रेत्याला मालाची तपासणी न करताच करार अंतिम करण्यास राजी करतात. विश्वास निर्माण करण्यासाठी फसवणूक करणारा सुरुवातीला विक्रेत्याच्या खात्यात एक छोटी टोकन रक्कम हस्तांतरित करतो आणि त्याला वाटाघाटीमध्ये गुंतवून ठेवतो. थकबाकी भरण्यासाठी ते विक्रेत्याला क्यूआर कोड पाठवतात आणि स्पष्ट करतात की हा क्यूआर कोड विक्रेत्याच्या खात्यात मिळालेल्या पेमेंटच्या पुष्टीकरणासाठी आहे. खरंतर हा क्यूआर म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विक्रेता पासवर्ड टाकताच फसव्या मार्गाने त्याच्या खात्यातून पैसे कापले जातात. फसवणूक करणारा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्यूआर दुसर्‍या पक्षाला शेअर करतो आणि कोड स्कॅन केल्यावर लगेच दुसर्‍या पक्षाच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगतो. निष्पाप लोकांना वाटते की त्यांच्या खात्यात पैसे येतील, पण उलट घडते आणि ते लोक सायबर गुन्हेगारीचे बळी ठरतात.

- Advertisement -

२. OLX, Quikr आणि सोशल मीडिया चॅनेलवर फसवणूक करणारे विक्रेते म्हणून लष्कर अधिकारी, बीएसएफ, सीआयएसएफ किंवा कोणत्याही ब्रँड नेमचा वापर करून स्वत:चा वेश करतात. त्यानंतर ते खरेदीदारांना कलेक्ट रिक्वेस्ट वापरून आगाऊ पेमेंट करण्यास सांगतात आणि प्रदान केलेल्या क्यूआर कोडवर पैसे पाठवण्यास सांगतात, परंतु त्या क्यूआर कोडमध्ये मोठी रक्कम दिलेली असते. खरेदीदार हे विक्रेत्याच्या हेतूंपासून अनभिज्ञ असतात आणि त्याची विनंती मान्य करण्याची चूक करतात.

३. ९९acer, magicBricks, NoBrokers या साईट्सवर फसवणूक करणारे भाडेकरू म्हणून लष्कर अधिकारी, बीएसएफ, सीआयएसएफ स्वत:चा वेश करतात आणि फ्लॅट किंवा घर भाड्याने मागतात. त्यानंतर ते सुरुवातीला घरमालकाच्या खात्यात एक छोटी टोकन रक्कम हस्तांतरित करतो आणि नंतर संपूर्ण घरभाडे भरण्यासाठी ते घरमालकांना क्यूआर कोड पाठवतात आणि स्पष्ट करतात की हा क्यूआर कोड घरमालकाच्या खात्यात मिळालेल्या पेमेंटच्या पुष्टीकरणासाठी आहे, तर क्यूआर म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विक्रेता पासवर्ड टाकताच फसव्या मार्गाने त्याच्या खात्यातून पैसे कापले जातात. फसवणूक करणारा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्यूआर दुसर्‍या पक्षाला शेअर करतो आणि कोड स्कॅन केल्यावर लगेच दुसर्‍या पक्षाच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगतो. निष्पाप लोकांना वाटते की त्यांच्या खात्यात पैसे येतील, पण उलट घडते आणि ते लोक सायबर गुन्हेगारीचे बळी ठरतात.

- Advertisement -

तसेच अनेकदा घरमालकांना स्वतःची आयडी, आधार कार्ड, पॅनकार्ड पाठवतात तसेच घरमालकालादेखील त्याचे आयडी, आधार कार्ड, पॅनकार्ड ओळख पटविण्यासाठी पाठविण्यास सांगतात आणि घरमालकाची कागदपत्रे मिळाल्यानंतर त्या घरमालकाच्या नावाने काही प्रकरणात फसवणूक करतात.

४. फसवणूक करणारे बनावट वेबसाईट तयार करून काही आकर्षक सौदे देतात, जे खरेदीदारांना आकर्षित करतात आणि क्यूआर कोडद्वारे फसव्या पेमेंट स्वीकारतात.

क्यूआर कोड फसवणूक कशी टाळावी?
=जर कोणी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगत असेल, तर तो फसवणुकीचा कॉल आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.
=फक्त ते क्यूआर कोड स्कॅन करा जे पूर्णपणे विश्वासार्ह आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की ते कोणी तयार केले.
=अज्ञात लाभार्थींकडून संकलित विनंत्या कधीही मान्य करू नका.
=जर तुम्ही एखादा क्यूआर कोड स्कॅन केला जो तुम्हाला वेब पेजवर घेऊन जाईल आणि तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, लॉगिन आयडी, पासवर्ड, पत्ता इत्यादी विचारेल तर टाळा.
=तुमच्या खात्यात पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. फसवणूक करणारे क्यूआर कोड पाठवून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.
=क्यूआर कोडमध्ये काय लपलेले आहे हे शोधण्यासाठी क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नका.
=सार्वजनिक क्यूआर कोड वापरताना सावधगिरी बाळगा. कारण सायबर गुन्हेगार अपराधी त्यांच्या खात्यात पैसे मिळविण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या क्यूआर कोडला खर्‍या क्यूआर कोडच्या जागी टाकू शकतात.

–योगेश हांडगे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -