घरफिचर्ससारांशक्वालिटी टाईम

क्वालिटी टाईम

Subscribe

अनेकदा भांडणे, चिडचिड आणि सतत घरात ताणतणावाचं वातावरण पसरतं. ते निवळण्यासाठी तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दिवसातून एकदा आपल्या प्रिय व्यक्तींशी वेळ काढून संवाद साधलात तरी तो संवाद दिवसभराच्या जवळीकतेसाठी पुरेसा असतो. कितीही अबोला असला, ताण असला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे कोणाला आवडत नाही? म्हणून तुम्ही जर एकमेकांपासून दूर असाल तर एकमेकांना भेटून वेळ घालवा. त्यामुळे त्या सहवासाचं आणि त्या वेळेचं महत्त्व तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच कळणार नाही, पण याअभावी आपली खरी संपत्ती असलेले नाते, आपली माणसं आपल्यापासून दुरावत चाललेली दिसतात. त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणे आवश्यक आहे, अन्यथा जीवनाची क्वालिटी खालावत जाईल.

–संकेत शिंदे

पूर्वी जेवण झालं, घरातली कामं आटोपली की सगळे जण घराच्या बाहेर येऊन बसत. घरच्यांशी, शेजार्‍यांशी मनमोकळ्या गप्पा त्यानिमित्ताने मारल्या जायच्या. एकमेकांची सुख-दुःख वाटली जायची, आधार दिला जायचा, तसेच मोठ्या गमतीजमतीही घडायच्या. हसणं, खेळणं, गप्पा, सगळ्याचेचं आवाज वातावरण जिवंत ठेवायचे. आता मात्र असं चित्र शहरात काय ग्रामीण भागामध्येही फारसं दिसत नाही. एकमेकांसाठी वेळ काढण्यापेक्षा स्वतः व कुटुंबापुरताच विचार दिसतो. कुठल्याही नात्याला समृद्ध करायचं असेल तर त्या नात्याला योग्य तेवढा वेळ देणं महत्त्वाचं असतं. प्रेम आणि वेळ या दोन्ही गोष्टीचं मिश्रण नात्याच्या स्वास्थ्यासाठी गुणकारी ठरतं. बरेचदा कामाच्या व्यापामुळे आपलं आपल्या कुटुंबीय, आईवडील, बायको, मुले, प्रियकर, प्रेयसी यांच्याकडे दुर्लक्ष होतं.

- Advertisement -

खरंतर ते आपल्याही नकळत घडत असतं, पण एक दिवस हे अंतर खूप वाढून नात्यांमध्ये खोल दरी निर्माण होते. भांडणे, चिडचिड आणि सतत घरात ताणतणावाचं वातावरण पसरतं. यासाठी तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दिवसातून एकदा आपल्या प्रिय व्यक्तींशी वेळ काढून संवाद साधलात तरी तो संवाद दिवसभराच्या जवळीकतेसाठी पुरेसा असतो. कितीही अबोला असला, ताण असला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे कोणाला आवडत नाही? म्हणून तुम्ही जर एकमेकांपासून दूर असाल तर एकमेकांना भेटून वेळ घालवा. त्यामुळे त्या सहवासाचं आणि त्या वेळेचं महत्त्व तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच कळणार नाही, पण याअभावी आपली खरी संपत्ती असलेले नाते, आपली माणसं आपल्यापासून दुरावत चाललेली दिसतात.

वेळेला संपत्तीचे आमिष दाखवून चालत नाही. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही संपत्ती कमावली तरीही पैशांनी वेळ ही विकत घेता येत नाही आणि वेळेनुसार सर्व काही विकत घेता येऊ शकतं, पण नातेसंबंध विकत घेऊ शकत नाही. पैशांचे फक्त आमिष दाखवून त्याची संपत्ती लुबाडता येऊ शकते, पण नात्यात झालेला दुरावा कसा मिटवता येईल? शक्यच नाही! पूर्ण आयुष्य जरी खर्च केलं तरीही यात किंचितही बदल होऊ शकत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे नात्यांना मिळत जाणारी किंमत ही ढासळलेली दिसते. नातं टिकवण्यासाठी कोणीही एक पाऊल मागे यायला तयार नाही. संपत्ती म्हणजे काय, असं विचारलं तर घर, गाडी, बंगला अशीच उत्तरं आपल्याला मिळतील. मला नाही वाटतं की आपल्याकडे असलेल्या नात्यांना कोणी संपत्ती म्हणेल. याचं कारण भौतिक सुखामध्ये आपण दिवसेंदिवस जास्त गुरफटत चाललो आहोत. सुखाची व्याख्या भौतिक वस्तूंजवळ येऊन थांबली आहे. पैशांनी जग विकत घेता येईल, असा समज असलेलं, कोणात फार न मिसळणारं आणि मिसळलेच तर लोकांशी बोलतानाही त्यांचे विषय पैशांपर्यंतच किंवा स्वत:ची श्रीमंती मिरवण्यापर्यंतच येऊन थांबायचे. त्यामुळे त्यांची टिंगलही उडवली जायची.

- Advertisement -

‘दुनिया झुकती है। झुकानेवाला चाहिए।’ फुकट मिळण्याच्या क्षणभंगूर आनंदाने सारे जण बरंच काही गमावतात. आपला मान, सन्मान, प्रतिष्ठा, योग्यता धुळीला मिळते. फुकटचे खाणारा, पिणारा, अशा माणसांना फुकट्या म्हणून त्याच्या मागे अथवा तोंडावरदेखील त्याची हेटाळणी करतात. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वकर्तृत्वाने जीवन नेहमीच उजळून निघते. कष्टाची मीठ भाकरी खाऊन धोंडा उशाशी घेऊन सुखाने झोप घेतो. फुकटच्या संपत्तीवर श्रीमंत झालेला रात्र रात्र झोप यावी म्हणून तळमळतो. म्हणूनच म्हणतात, नसे राउळी व नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी. प्रत्यक्ष परमेश्वरदेखील श्रम करतो. कृष्णाने गोकुळात गाई राखल्या, भक्तांच्या प्रेमासाठी त्याने कोणाचे दळण दळले, कुणाचे शेले विणले, संतांच्या घरी राब राब राबला. देवदेखील भक्तांचे प्रेम फुकट घेत नाही. सव्याज परत करतो. प्रेम फक्त निरपेक्ष आणि शुद्ध हवे. हे कळण्यासाठी आपल्या मानगुटीवर बसलेले फुकटचे भूत उतरवायला हवे. फुकटचा आनंद क्षणभंगूर असतो. फुकट मिळालेल्या कोणत्याही गोष्टीचे कोणालाही महत्त्व वाटत नाही. त्यासाठी योग्य ती किंमत न मोजल्याने त्याची कसलीच चिंता नसते म्हणून श्रमलक्ष्मी हीच खरी लक्ष्मी. फुकटचे काही नको, पैसा, वस्तू, धनदौलतच नव्हे तर अगदी वेळ, पैसा व श्रम हेसुद्धा फुकट घेऊ नयेत. वेळेला वेळ, श्रमाला श्रम, उपकरास उपकार यांची क्षणोक्षणी जाणीव असावी.

मुळात माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. आपल्या प्रत्येक चांगल्या-वाईट घटनांमध्ये आपल्याला एकमेकांची गरज लागत असते, आधार हवा असतो. आपल्याला आनंद झाला, तर आपल्याबरोबर इतरांनीही त्यात सहभागी व्हावे, दुःख झालं तर आपली समजूत काढावी हे आपल्या मूळ स्वभावातच आहे. त्यामुळे जवळ कितीही पैसा असला तरी माणसांशिवाय आयुष्य पूर्ण होत नाही. त्यामुळेच तर बोलायला कोणी नसलेल्या व्यक्ती नैराश्यात जातात. तणावातून बाहेर पडणं अशा व्यक्तींसाठी अवघड होऊन बसतं. या तक्रारी दूर करण्यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत जरी घेतली तरी ते हेच सांगतात की, जवळच्या व्यक्तींशी बोला, मोकळे व्हा, पण जवळच्या व्यक्तींकडे आपल्यासाठी वेळ असतो का, हा प्रश्नही अशा वेळी सतावतो. आजकालच्या कुटुंब पद्धतीतही मोठे बदल झाले आहेत. एकत्र कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंब जास्त दिसतात. घरातही मोजून तीन-चार माणसं. त्यात आई-बाबा नोकरीसाठी आणि घरात मूल एकटंच किंवा आपल्या भावंडासोबत. कामाच्या नादात स्वतःच्या कुटुंबासाठीही घरातल्या मोठ्यांकडे वेळ नसतो. अशा वेळी बोलणार कोणाशी? यामुळेच नात्यांमध्येही कोरडेपणा तयार होतो. अशात आपल्यासाठी कोणी वेळ काढला तर आतल्या आत मात्र आपण सुखावून जातो.

आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपल्या नातलगांना घेऊन छोट्याशा कौटुंबिक सहलीला किंवा जेवणाला जा. याव्यतिरिक्त घरच्या घरीच तुम्ही लहान पार्टीची व्यवस्था करून स्वत:ला आणि त्यांनाही आनंदी करू शकता. याला ‘क्वालिटी टाईम’ म्हणतात. इतरांना वेळ देणं जसं महत्त्वाचं आहे तसंच स्वत:साठी आणि स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपले सर्व दैनंदिन कार्य जसे सकाळी उठणे, ऑफिसची तयारी, घराची कामे, झोपण्याची वेळ, व्यायाम, जेवण इत्यादी गोष्टी वेळेनुसार करायला हव्यात. यामुळे आपल्याला कठीण परिश्रम करण्याची ताकद मिळते आणि म्हणूनच कधीही चांगल्या कामांना टाळता येत नाही. कोणतंही नातं हे वेलीसारखं असतं. त्याला गगनावरी जायला वेळ द्यावाच लागतो. वेळेचे महत्त्व समजून त्यानुसार आपली सर्व कार्ये करायला हवीत. संत कबीर म्हणतात ना…

कल करे सो आज कर, आज करे सो अब…
पल में परलय होएगी, बहुरि करेगा कब…
म्हणूनच एक वाक्य सध्या तुम्हाला सोशल मीडियावर ऐकायला, वाचायला मिळेल. तुम्हाला एखाद्याला काही भेटवस्तू द्यायची असेल, तर त्याला तुमचा वेळ द्या. कोणत्याही भेटवस्तूपेक्षा ती व्यक्ती तुम्ही दिलेल्या वेळेनेच आनंदी होईल. कारण कोणी आपल्यासाठी वेळ काढणे हीच खरी संपत्ती आहे हे हळूहळू का होईना प्रत्येकाच्याच लक्षात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -