घरफिचर्ससारांशडेटिंग अ‍ॅप्सवरून सेक्सटॉर्शन

डेटिंग अ‍ॅप्सवरून सेक्सटॉर्शन

Subscribe

अ‍ॅप्सचा वापर करून नागरिकांना लुटले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत म्हणून सोशल माध्यमांवरील डेटिंग अ‍ॅपवर तुम्ही अधिक वेळ घालवत असाल तर सावध राहा. डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करून सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढत आहेत. व्हिडीओ कॉलची स्क्रीन रेकॉर्डिंग करून आपणास पाठवून आपल्या फेसबुक फ्रेंड व यू ट्यूबला अपलोड करण्याची धमकी देऊन तसेच ते रेकॉर्डिंग तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे सेक्सटॉर्शनपासून सावध राहा.

–योगेश हांडगे

डेटिंग अ‍ॅप्सच्या वापरामुळे आयुष्याचा जोडीदार शोधणे आता फार सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक जण या अ‍ॅप्सचा नवीन जोडीदार, पार्टनर शोधण्यासाठी वापर करीत असतात. देशात डेटिंग साईट्स आणि डेटिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात Tinder, Bumble, Badoo, woo सारख्या अ‍ॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे. इतर सोशल मीडियासारखे बरेच जण आपली ओळख लपवून बनावट आयडीद्वारेदेखील या अ‍ॅप्सचा वापर करताना दिसतात.

- Advertisement -

इंटरनेट आणि डिजिटलायझेशनच्या युगात ऑनलाईन जोडीदार शोधणे आता सहज शक्य झाले आहे. डेटिंग साईट्स आणि डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या पसंतीचा जोडीदार निवडू शकता. आधुनिकतेच्या या युगात आपला जोडीदार निवडण्यासाठी अनेक लोक डेटिंग साईट्सची मदत घेतात.

सावधानता बाळगा
अ‍ॅप्सचा वापर करून नागरिकांना लुटले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत म्हणून सोशल माध्यमांवरील डेटिंग अ‍ॅपवर तुम्ही अधिक वेळ घालवत असाल तर सावध राहा. डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करून सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढत आहेत.

- Advertisement -

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
डेटिंग अ‍ॅप्सवर अथवा फेसबुकवर अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्या महिलेचा प्रोफाईल फोटो अत्यंत मोहक असल्यामुळे ती रिक्वेस्ट स्वीकारण्याची इच्छा होते. त्यानंतर ओळख वाढवून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घेऊन अनोळखी महिला अश्लील चॅट करते. नंतर ती तिचा स्वत:चा न्यूड व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवर दाखवते व आपणासदेखील त्या व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यास सांगितले जाते. व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल चालू असताना समोरची व्यक्ती अश्लील चाळे करते किंवा करण्यास भाग पाडते आणि कॉल चालू असताना स्क्रीन रेकॉर्डिंग केले जाते.

व्हिडीओ कॉलची स्क्रीन रेकॉर्डिंग करून आपणास पाठवून आपल्या फेसबुक फ्रेंड व यू ट्यूबला अपलोड करण्याची धमकी देऊन तसेच ते रेकॉर्डिंग तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी केली जाते.

सेक्सटॉर्शनमुळे झाल्यात आत्महत्या
अशाच एका प्रकारात पैशांची मागणी केल्यानंतर पैसे न दिल्यास नग्न व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, ट्विटर, यू ट्यूब येथे प्रसारित करण्याची धमकी दिल्याने पुणे येथील तरुणांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर प्रसारित करण्याची भीती दाखवून खंडणीची धमकी देण्याचे प्रकार वाढल्याने अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टपासून सावध राहा, असा सल्ला सायबर पोलीस आणि सायबर तज्ज्ञ देतात.

कुठली काळजी घ्यावी?
— कुणाशीही अश्लील चॅट करू नका.
— खासगी फोटो किंवा व्हिडीओ कोणालाही शेअर करू नका, तसेच न्यूड व्हिडीओ कॉल करू नका.
— न घाबरता सायबर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.

–(लेखक संगणक विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -