घरफिचर्सगणितज्ज्ञ शकुंतला देवी

गणितज्ज्ञ शकुंतला देवी

Subscribe

शकुंतला देवी यांचा आज स्मृतिदिन. शकुंतला देवी यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी बंगलोरमध्ये झाला. त्यांचे कुटुंब म्हणजे पारपंरिक कन्नड ब्राह्मण. पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले. त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कसमधील आडवाटेवरची नोकरी धरली.

शकुंतला देवींचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. शकुंतला तीन वर्षांच्या असताना त्यांना पत्त्यांचे खेळ शिकवताना त्यांच्या अफाट स्मरणशक्तीचे ज्ञान वडिलांना झाले. त्यांनाच शकुंतला देवी यांच्यामधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याच्या शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतला यांचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतला यांनी म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.

- Advertisement -

शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. १९७6 मध्ये आपल्या अमेरिका दौर्‍यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली.

१९७७ मध्ये डलास विद्यापीठात शकुंतला यांचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद कॉम्प्यूटर ‘युनिव्हॅक’शी झाला. तेथे शकुंतला देवी यांनी एका २०१ अंकी संख्येचे २३ वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला कॉम्प्यूटरला ६२ सेकंद लागले.

- Advertisement -

१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते. शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिले. १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान झाले.

शकुंतला देवी यांच्या अंगी एक अद्भूत प्रतिभा होती. अख्ख्या भारतास त्याची दखल घ्यावी लागली. गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती. भारतात परतल्यावर १९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचे विशेष आमंत्रण आले. या विभागातील प्रा.आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचे घनमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी यांचे उत्तर तयार असायचे. अशा या महान गणितज्ज्ञाचे 21 एप्रिल 2013 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -