घरफिचर्सभारतातील पहिले एशियाड

भारतातील पहिले एशियाड

Subscribe

भारतातील पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ४ मार्च १९५१ साली झाले. या अंतर्गत विविध स्पर्धा ४ ते ११ मार्च या कालावधीत चालल्या. हे भारतातील पहिले एशियाड म्हणून गणले गेले.

भारतातील पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ४ मार्च १९५१ साली झाले. या अंतर्गत विविध स्पर्धा ४ ते ११ मार्च या कालावधीत चालल्या. हे भारतातील पहिले एशियाड म्हणून गणले गेले. हे आशियाई खेळ सुरुवातीला १९५० साली घेण्याचे नियोजित करण्यात आले होते, पण विविध क्रीडा प्रकारासाठी आवश्यक मैदाने आणि सुविधा वेळेवर तयार होऊ न शकल्यामुळे एशियाड एक वर्ष पुढे ढकलण्यात आले.१३ फेब्रुवारी १९४९ साली एशियन गेम्स फेडरेशनची दिल्लीत स्थापना करण्यात आली. त्यावेळी दिल्ली हे यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. या खेळांमध्ये ४८९ खेळाडूंनी भाग घेतला होता. आशिया खंडातील स्वतंत्र झालेल्या देशांना आशियाई खेळांसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याला सोव्हियत संघ आणि व्हिएतनामचा अपवाद होता. त्या देशांच्या राजकीय रचनेमुळे त्यांना निंमत्रित करण्यात आले नव्हते. चीनला निमंत्रण देण्यात आले होते. पण त्यांनी ते नाकारले होते. पाकिस्तानला काश्मीरच्या मुद्यावर भारताशी संघर्ष सुरू असल्यामुळे दूर ठेवण्यात आले होते. दिल्लीतील राष्ट्रीय स्टेडियमवर हे क्रीडा सामाने झाले. या खेळांचा लोगो हा सूर्य आणि त्याच्या खाली ११ वर्तुळे होती. या वेळी ११ देशांनी एशियाडमध्ये भाग घेतलेला होता. म्हणून ही ११ वर्तुळे दाखवण्यात आली होती. सफेद पार्श्वभूमी ही शांततेचे निदर्शक होते.

पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऑलिंपिकमध्ये जपानला प्रवेश नाकारण्यात आला होता. कारण अमेरिका आणि जपान यांच्यात मोठा संघर्ष उडालेला होता. पण जपानला भारतीय एशियाडमध्ये भाग घेण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. या एशियाड स्पर्धेमध्ये जपानच्या खेळाडूंनी सगळ्यात जास्त सुवर्ण पदके आणि इतर पदके मिळवली होती. सुवर्ण २४ आणि एकूण ६० पदके मिळवली होती. भारताला १५ सुवर्ण पदके मिळाली होती, तर ५१ अन्य पदके मिळाली होती. पदतालिकेत भारत दुसर्‍या क्रमांकावर होता. त्यानंतर भारताने ३१ वर्षांनंतर दिल्लीत दुसर्‍यांदा आशियाई खेळांचे आयोजन केले होते. त्यावेळी क्रीडा चिन्ह अप्पू होते. हे एशियाड ८२ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यावेळी भारत पदतालिकेत पाचव्या क्रमांकापर्यंत पोहोचला होता. या एशियाडमध्ये चीनने भाग घेतला होता. मुख्य चुरस ही चीन आणि जपानच्या खेळाडूंमध्ये होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन या एशियाडचे आयोजन दिल्लीत केले होते. विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारी मैदाने आणि सुविधा तयार करण्यात आल्या होत्या. यावर मोठा खर्च करावा लागला होता. तो भरून काढण्यासाठी त्यावेळी देशात महागाई काही प्रमाणात वाढली होती. भारतात आशियाई सामने भरविल्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्यावेळी सतपाल या पैलवानाने मंगोलियाच्या पैलवानाला हरवून सुवर्ण पदक मिळवले होेते. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगले यश मिळविले आहे. आशियाई खेळांमध्ये पुढे ऑलिंपिकची तयारी होत असते. क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे देशावर मोठा आर्थिक भार पडत असला तरी जागतिक पातळीवरच्या क्रीडा सुविधा देशात निर्माण होत असतात. त्याचा फायदा देशातील खेळाडूंना पुढील काळातील सामान्यांच्या तयारीसाठी होत असतो. ही दूरदृष्टी ठेवून इंदिरा गांधी यांनी एशियडचे आयोजन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -