ज्याप्रमाणे जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देणार्या परिचारिकांसाठी एक दिवस साजरा केल्या जातो. तो दिवस म्हणजे 12 मे. जागतिक परिचारिका दिनाची सुरुवात ही बरेच वर्षा आधी झालेली आहे, सुरुवातीला हा दिवस साजरा करण्यात येत नव्हता. परंतु 1971 मध्ये आंतराष्ट्रीय नर्स परिषदेने आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला त्या दिवसाला जागतिक नर्स दिवस म्हणजेच जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आले. आणि तेव्हापासून संपूर्ण जगात 12 मे ला जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.
परिचारिका म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती, त्यांना वेळोवेळी लागणार्या गोष्टी पुरवणारी व्यक्ती, रुग्णांची चांगल्या प्रकारे निगा राखणारी व्यक्ती, या व्यक्तीचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांचे जीवन हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या सेवेला वाहिलेले असते. जागतिक विद्यार्थी परिचारिका हा दिवस 8 मेला 1998 पासून साजरा केला जातो आणि 6 मे ते 12 मेपर्यंत या आठवड्यात जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्यांचा जन्म 12 मे 1820 मध्ये इटली येथे झाला होता, त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या.
तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्यासुध्दा होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोकांची सेवा केली. त्या रात्री जागून तासंतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत. त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी म्हटले जात असे. तसेच त्यांच्या नावाने लंडनमध्ये नर्सिंग स्कूल सुध्दा उघडण्यात आले आणि त्या पहिल्या महिला होत्या ज्यांना 1907 मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोरोना काळात जगभरातील नर्सेसनी रुग्णांची केलेली सेवा सार्या जगाने पाहिली. स्वत:चा जीव धोक्यात घालून मानवजातीवर आलेल्या संकटाला परतवून लावणार्या नर्सेसना मानाचा मुजरा.