घरताज्या घडामोडीरवी राणांना आशीर्वाद फडवीसांचे; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

रवी राणांना आशीर्वाद फडवीसांचे; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद माफिनाम्यानंतरही दुमस्थो आहे. खोक्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील हा वाद घरात घुसून मारण्यापर्यंत गेला. रवी राणा यांनी 'घरा घुसून मारेन' असे वक्तव्य केले होत.

गेल्या अनेक दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद माफिनाम्यानंतरही दुमस्थो आहे. खोक्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील हा वाद घरात घुसून मारण्यापर्यंत गेला. रवी राणा यांनी ‘घरा घुसून मारेन’ असे वक्तव्य केले होत. रवी राणांच्या या वक्तव्यांमागे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. (ravi rana devendra fadnavis allegation bacchu kadu maharashtra)

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आमदार बच्चू कडू मंगळवारी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, ही परिषद सुरु होण्यापूर्वी बच्चू कडू यांची सहकाऱ्याबरोबर सुरु असलेली कुजबूज कॅमेरात कैद झाली आहे. त्यानुसार, संबंधित कर्मचाऱ्याने ‘काय ऐकतोय काय झालं अजून?,’ असे बच्चू कडूंना विचारले. त्यावर बच्चू कडूंनी उत्तर देताना “3 तारखेला तीन वाजता वाद मिटला सांगितले. 6 वाजता घरात घुसून मारू आणि आज म्हणतयं वाद नाही राहिला. डोक्यावर परिणामं झालाय वाटतं. ते म्हणतयं देवेंद्रजी सांगत आहे, तेच बोलतोय”, असे म्हटले.

- Advertisement -

पत्रकार परिषद असल्यामुळे सर्व प्रसारमाध्यमांचे माईक सुरू होते. त्यावेळा एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने त्यांना माईक सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर बच्चू कडू आणि दोघे जण सावध झाले आणि चर्चा थांबवली. दरम्यान, बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील २० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, अशा प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी बच्चू कडू मुंबईत आले होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आम्हाला वाद आणखी वाढवायच नाही, असे म्हटले. “रवी राणा आणि नवनीत राणा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही म्हणायचं का की त्यांनी पैसे घेतले? हा वाद आणखी पेटवायचा नाही. माध्यमं वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी पेटवणार नाही. आज रात्रीच राणांना भेटणार, त्यावेळी माध्यमांनाही बोलावणार आहे. आम्ही दोघे भेटून एकाच पंगतीत जेवायला बसू” असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

- Advertisement -

‘सामना’ अग्रलेखातही राणांच्या मागे फडणवीसांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख

रवी राणांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखातही करण्यात आला होता. रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमानभक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे शरसंधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपावर केले आहे.


हेही वाचा – ‘तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा’; अजित पवारांनी सरकारकडे मागितला तपशील

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -