राजस्थानमधील ‘या’ मंदिरात केली जाते रावणाची पूजा, दसऱ्या दिवशी व्यक्त केला जातो शोक

यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. देशभरातच दसऱ्याचा उत्साह दिसत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात प्रत्येक वर्षी रामलीला आणि रावण दहन केले जाते.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमीला सर्वत्र दसरा साजरा केला जातो. विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याच्या दिवशी सांगता होते. या दिवशी देवीची पूजा केली जाते आणि रावण दहन सुद्धा केले जाते. यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. देशभरातच दसऱ्याचा उत्साह दिसत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतात प्रत्येक वर्षी रामलीला आणि रावण दहन केले जाते. मात्र, आजच्या दिवशी राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक अशा समाज आहे, जो दसऱ्याच्या दिवशी शोक साजरा करतो. खरंतर, जोधपुरचे श्रीमाली दवे गोधा समाज स्वतःला रावणाचे वंशज मानतात. ते दसऱ्याचा दिवश शोक म्हणून साजरा करतात. या दिवशी जोधपुरमध्ये रावणाच्या मंदिरामध्ये पूर्ण विधिवत पूजा- अर्चना केली जाते.

रावणाची पूजा
श्रीमाली गोधा ब्रह्माणांचे मत आहे की, रावण एक महान संगीतज्ञ विद्वाना व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्राचे प्रकांड पंडित सुद्धा होता. अशी मान्यता आहे की, रावणाची पत्नी मंदोदरी जोधपुरच्या मंडोर मधील होती. त्यामुळे रावणाला जोधपुरचा जावई देखील म्हटलं जातं. जोधपुरच्या मेहरानगढ किल्ला रोडवर असलेल्या मंदिरामध्ये रावण आणि मंदोदरीची मूर्ती देखील समोरा-समोर स्थापित करण्यात आला आहे. या मंदिराची निर्मिती सुद्धा गोधा गोत्राचे श्रीबाली ब्राह्मणांनी केली आहे. यांची अशी मान्यता आहे की रावणाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होते. तसेच वाईट नजरेपासून देखील वाचवते.

रावण एक महान संगीततज्ञ आणि विद्वान होता
रावण मंदिरातील पुजाऱ्यांच्या मते, आम्ही रावणाचे वंशज आहे. जेव्हा त्यांचे लग्न झाले. तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही वऱ्हाडी बनून आलो होतो. त्यावेळी काही लोक इथेच स्थायिक झाले. ज्यांचे आम्ही वंशज आहोत. त्यानुसार रावण एक महान संगीतज्ञ, विद्वान आणि ज्योतिष शास्त्रज्ञ होता. रावण मायावी देखील होता. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनासाठी लांबून येतात. रावणाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्याने व्यक्तिचा आत्मविश्वास वाढतो.


हेही वाचा :

दसऱ्याच्या दिवशी करा ‘हे’ चमत्कारी उपाय; होईल धनलाभ