मेष :- तुमच्या बाजूने चांगला निर्णय लागेल. लोकांचे सहाय्य मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. डोळ्यांची सुधारणा होईल.
वृषभ :- दुखापत संभवते. कोणतेही काम करताना सावध रहा. भलत्या जाळ्यात अडकू नका.
मिथुन :- मनाप्रमाणे घटना घडेल. औषधे वेळेवर घ्या. नोकरीत सुधारणा होईल. समस्या संपवा.
कर्क :- गुप्त कारवायांचा त्रास होईल. कुटुंबात तणाव होईल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
सिंह :- तुमचे महत्त्व वाढलेले पाहून वरिष्ठ मनातून चटकतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
कन्या :- क्षुल्लक व्यक्ती तुमच्या कामात अडथळे आणण्याची शक्यता आहे. पैसे देऊन काम होईल असे समजू नका.
तूळ :- नातलगांची भेट होईल. तुमचे महत्त्वाचे काम आज करून घ्या. अरेरावी कुठेही करू नका.
वृश्चिक :- धंद्यात फायदा होईल. मोठे काम ओळखीमधून मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल.
धनु :- नव्या लोकांना सहवास मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. मौज-मजेत रहाल.
मकर :- प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा. आप्तेष्ट मदत करतील. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल.
कुंभ :- स्पर्धेत चमकाल. धंद्यात जम बसेल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल.
मीन :- मनातील स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण होईल. घरातील समस्येवर उपाय शोधता येईल.