घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार ०८ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : शुक्रवार ०८ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. आपसातील तणाव मिटण्याची शक्यता दिसेल. तुम्ही स्थिर रहा.

वृषभ : धंद्यात मेहनत घ्या. वसुली करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांचा सल्ला मानावा लागेल. वाहन जपून चालवा.

- Advertisement -

मिथुन : किरकोळ अडचण दूर करता येईल. नवीन नोकरी शोधता येईल. स्पर्धा जिंकाल. आनंदी व्हाल.

कर्क : घरातील व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. नातलगांसाठी धावपळ होईल. कामात लक्ष द्या.

- Advertisement -

सिंह : मनाप्रमाणे घटना घडेल. स्पर्धेत चमकाल. विचारांना दिशा मिळेल. घरात सुखद वातावरण राहील.

कन्या : पोटाची काळजी घ्या. क्षुल्लक विरोधाचे जास्त भांडवल करू नका. कामाचा व्याप वाढेल. ओळखी होतील.

तूळ : कल्पनाशक्तीला चालना मिळेल. आनंदी रहाल. नोकरी मिळवता येईल. महत्त्वाचे काम करा.

वृश्चिक : धंद्यात जम बसवा. नवे काम मिळेल. ओळखी होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

धनु : प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. प्रवासात घाई नको. धंद्यात चर्चा यशस्वी होईल. वसुली करा.

मकर : जिद्द ठेवा. कोणताही वाद वाढवू नका. कामात लक्ष द्या. चूक करू नका. धंद्यात कष्ट घ्या.

कुंभ : मन अस्थिर होईल. दुपारनंतर तुम्हाला दिशा मिळेल. आप्तेष्ट भेटतील. धंद्यात मोठे काम मिळेल.

मीन : किरकोळ अडचण येईल. घरातील कामे वाढतील. जवळच्या लोकांची काळजी घ्या. राग करू नका.

- Advertisment -