Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : मुले तुमच्या कार्यात मदत करतील. राजकारणात तुमचे महत्त्व वाढेल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात जम बसेल.

- Advertisement -

वृषभ : घरगुती कामात छोट्या अडचणी येतील. पोटाची काळजी घ्या. वाद कोणताही असला तरी सौम्य धोरण ठेवा.

मिथुन : विरोधकांना नमवता येईल. तुमचे वर्चस्व वाढण्यास सुरुवात होईल. नोकरी मिळेल. कोर्टकेस जिंकाल.

- Advertisement -

कर्क : कठीण कामात सुसह्यता निर्माण होईल. घरातील माणसांची काळजी घ्यावी लागेल. वस्तू खरेदी कराल.

सिंह : जमिनीसंबंधी काम करून घेता येईल. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल.

कन्या : घरात तणाव होईल. पदार्थांचे नुकसान होईल. मौल्यवान वस्तू वेळेवर जागच्या जागी ठेवा. स्पर्धा सोपी नाही.

तूळ : कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. अविवाहितांना स्थळे मिळतील.

वृश्चिक : धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

धनु : राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्याल. नवे काम स्वीकारावे लागेल. प्रवासात घाई करू नका. धोका होईल.

मकर : घरगुती कामावरून किरकोळ वाद होईल. काम करताना अडचण येईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम ऐकावे लागेल.
कुंभ ः सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. घरातील वाद मिटवाल. धंद्यात जम बसेल. रागावर ताबा ठेवा. प्रेमात यश मिळेल.

मीनः आजचे काम आजच करा. कोर्टाचे काम मार्गी लागेल. प्रेमात सावध रहा. वडीलधार्‍यांची काळजी घ्या. तब्येत उत्तम राहील.

- Advertisment -