राशीभविष्य: सोमवार २० जून २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष : आजचा दिवस कसोटीचा असेल. धावपळ होईल. कोणतेही काम लक्ष देऊन करा. घरात नाराजी होईल.

वृषभ : मनापासून केलेले काम नीटच होते. वेळेचा अंदाज नीट घ्या. आप्तेष्ठ भेटतील.

मिथुन ः ठरविलेली योजना पूर्ण होईल. स्पर्धा जिंकाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंदा वाढेल.

कर्क : विचारांना चालना मिळेल. नवीन ओळख झाल्याने उत्साह वाढेल. कामात वेळ जाईल.

सिंह : धंद्यात फायदा होईल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. मन चिंतनात रमेल.

कन्या ः विचारांची दिशा बदलावी असे वाटेल. धंद्यात फायदा होईल. तुमचे महत्त्व टिकवून ठेवा.

तुला : कामाच्या व्यापात एखादे काम राहून जाण्याची शक्यता आहे. घाई करू नका. कमी बोला.

वृश्चिक : महत्त्वाच्या कामाकडे लक्ष पुरवा. गोड बोला. आळस करू नका. मनाची एकाग्रता होईल.

धनु : उत्साह वाढेल. पाहुणे येतील. जीवाभावाची माणसे तुमच्या हिताचा विचार करतील.

मकर : तुमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. मोठे लोक तुमची स्तुती करतील. धंद्यात वाढ होईल.

कुंभ : शांतपणाने कामे करा. इतर व्यक्ती तुम्हाला पेचात पकडू शकतात. हिशोब नीट करा.

मीन : सकाळची कामे तेव्हाच करा. अरेरावी करू नका. प्रेमाची माणसे भेटतील. चिंतन करा.