घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार २८ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : सोमवार २८ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा. काही लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न जरूर करतील. रागावर ताबा ठेवा.

वृषभ : राजकीय-सामाजिक कार्यात स्थिर मनाने काम करा. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी येईल. मित्र मदत करतील.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत वर्चस्व वाढेल. जवळचे सहकारी क्षुल्लक कारणाने अडथळे निर्माण करतील. तुम्ही खंबीर रहा.

कर्क : प्रेमाने वागा. काम गोड बोलून करून घ्यावे लागेल. नोकरीत कामाचा व्याप सहन करावा लागेल. यश खेचा.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. वरिष्ठ खूश होतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा जिंकाल. ओळखी होतील.

कन्या : स्वतःचे गुपित उघड करण्याची गरज नाही. तुम्ही तत्परता ठेवा. चातुर्याने स्वतःचे काम करून घेता येईल.

तूळ : जवळचे लोक तुमच्या सुखाचा हेवा करतील. जास्त गोष्टींची चर्चा करू नका. तुमचा नावलौकिक जपा. सावधपणे चाला.

वृश्चिक : अडचणी दूर करता येईल. चौफेर तुमच्या कामाचे कौतुक होईल. कला-क्रीडा-साहित्यात विशेष यश मिळेल.

धनु : महत्त्वाचे काम करता येईल. धंद्यात वाढ होईल. ओळखी होतील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल.

मकर : धंद्यात बोलणी करताना, करार करताना सावध रहा. तुमच्या कार्याला मदत मिळू शकेल. नम्रपणे रहा.

कुंभ : खाण्या-पिण्याची काळजी घ्या. खर्चावर ताबा ठेवणे कठीण होईल. महत्त्वाची वस्तू वेळेवर नीट ठेवा.

मीन : घरातील कामे होतील. व्यवसायात मोठी खरेदी-व्रिकी करता येईल. नावलौकिक वाढवणारी घटना घडेल.

- Advertisment -