घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार २४ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : शनिवार २४ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – घरातील कामे होतील. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. धंद्यात मोठे काम मिळेल. महत्त्वाचा निर्णय आजच घ्या.
वृषभ – धंद्यात दुर्लक्ष करू नका. खर्च वाढण्याची शक्यता आहे. दुसर्‍याच्या कामासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च करावा लागेल.
मिथुन – आज ठरविलेले काम आजच करून घ्या. धंद्यात नवे काम मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यातील चर्चा सफल होईल.
कर्क – काम करण्यात किरकोळ अडचण येऊ शकते. बोलताना काळजी घ्या. नातलग भेटतील. भेट वस्तू मिळेल.
सिंह – कोणताही महत्त्वाचा विचार आजच करा. धंद्यात वाढ होईल. वसुली करून घ्या. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल.
कन्या – कामातील समस्या कमी होईल. जवळच्या माणसांसाठी धावपळ होईल. मुलांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. खर्च होईल.
तूळ – नोकरीत महत्त्वाचे काम पूर्ण करा. वरिष्ठांच्या बरोबर कामाची चर्चा करता येईल. कला क्षेत्रात मन रमेल. क्रीडा स्पर्धा जिंकाल.
वृश्चिक – चिडचिडेपणा करू नका. तुम्हाला गोड बोलून काम करून घ्यावयाचे आहे. नवीन ओळख झालेल्याबरोबर व्यवहार करू नको.
धनु – काम रेंगाळत ठेवू नका. आजचे काम आजच करा. धंद्यात वाढ होईल. नवीन लोकांची ओळख होईल. विचारांना चालना मिळेल.
मकर – तुमच्या कार्याला गती देता येईल. किरकोळ कारणाने नाराज होऊ नका. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. कोर्टकेस मार्गी लागेल.
कुंभ – जीवनसाथी, मुले यांच्याबरोबर मजेत वेळ घालवाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. स्पर्धेत पुढे जाल. यश मिळेल.
मीन – कठोर बोलण्यामुळे माणसे दुरावतात. धंद्यात हिशोब नीट करा. पाहुणे येतील. शेजारी कामासाठी येईल. त्यांना मदत करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -