Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार ०७ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : गुरुवार ०७ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : महत्त्वाचे काम आजच करून घ्या. लोकांचे सहकार्य मिळेल. नवे कंत्राट मिळवता येईल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

वृषभ : धंद्यात नवे काम मिळेल. फायदा होईल. ओळखी वाढतील. नोकरीत प्रगती होईल.

मिथुन : तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे कामे होतील. कामांची गर्दी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

- Advertisement -

कर्क : पोटाची काळजी घ्या. घरात क्षुल्लक वाद होईल. खरेदी करताना खिसा-पाकीट सांभाळा.

सिंह : मुले आनंद देतील. जीवनसाथीची प्रगती होईल. नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न यश देईल. धंदा वाढेल.

कन्या : शेजारी निष्कारण कुरकुर करेल. पोटाची तक्रार जाणवेल. महत्त्वाची वस्तू वेळच्यावेळी जागेवर ठेवा.

तूळ : विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा साहित्यात प्रसिद्धी मिळेल. नवीन परिचय होईल.

वृश्चिक : व्यवसायाला कलाटणी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल. आनंदाची बातमी कळेल.

धनु : तुमच्या ध्येयाला सर्वांची मदत मिळेल. जीवनाला कलाटणी मिळेल. नवीन ओळख होईल.

मकर : जिद्दीने कठीण कामात यश मिळवाल. जवळच्या व्यक्तींची मर्जी पाहून मत व्यक्त करा. धंद्यात लक्ष द्या.

कुंभ : तुम्हाला यश मिळेल. पुरस्कार मिळेल. कौतुकाचे बोल ऐकाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

मीन : धंद्यात फायदा होईल. सावधपणे व्यवहार करा. विलंब सहन करा, घरातील माणसांना दुखवू नका.

- Advertisment -