घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार १४ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : गुरुवार १४ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : तुम्ही तयार केलेली योजना पूर्ण करता येईल. कर्जाचे काम करून घ्या. नवीन ओळखीचा उपयोग होईल.

- Advertisement -

वृषभ : अडचणींवर मात करता येईल. जवळच्या माणसांना कमी समजू नका. प्रेमाने वागा. मार्ग शोधता येईल.

मिथुन : किरकोळ कारणाने ठरविलेला कार्यक्रम बदलावा लागेल. मन आनंदी ठेवा. प्रयत्न महत्त्वाचे ठरतील.

- Advertisement -

कर्क : वेळेला महत्त्व द्या. आळस करू नका. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत काम करून घेता येईल. संयम ठेवा.

सिंह : रेंगाळत न राहता महत्त्वाची कामे करा. उत्साह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात पराक्रम कराल.

कन्या : दिशा मिळेल. नवे काम मिळेल. काम लहान मोठे हा विचार न करता उद्योगात रहा. आनंदी व्हाल.

तूळ : दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वतःचे काम करा. विचारांना चालना मिळेल. नवीन ओळख होईल.

वृश्चिक : आजच्या कामात आळस किंवा चालढकलपणा करू नका. मोठे यश मिळवाल, स्पर्धा जिंकता येईल.

धनु : गुप्त कारवाया ओळखणे सोपे नसते. प्रवासात सावध रहा. नवीन ओळख होईल. नवे पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर : आजच ठरविलेले काम करून घ्या. उद्या अडचण जास्त येऊ शकते. नोकरीत ताण राहील. तुम्ही शांत रहा.

कुंभ : जास्त काम करावे लागले तरी यश मिळवाल. स्पर्धेत तुमचे कौतुक होईल. नवी ओळख होईल.

मीन : शेअर्सचा अंदाज घेता येईल. स्पर्धा जिंकाल. खरेदी कराल. उत्साह वाढेल. धंदा मिळेल. तब्येत उत्तम राहील.

- Advertisment -