घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २० मार्च २०२४

राशीभविष्य : बुधवार २० मार्च २०२४

Subscribe

मेष – कला-क्रीडा स्पर्धेत यश मिळेल. प्रतिष्ठा, नावलौकिक वाढेल. वर्चस्व सिद्ध कराल. धंद्यात वाढ होईल. यश मिळेल.
वृषभ – सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. कामात तुमची तक्रार विचारात घेतली जाईल. उत्साह निर्माण होणारी घटना घडेल.
मिथुन- इतरांच्या बरोबर स्वतःची तुलना केल्यास उदास व्हाल. कुणाला कमी लेखू नका. तुलना करू नका. घर खरेदी कराल.
कर्क – मुलांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा लागेल. मुले यशस्वी होतील. कौटुंबिक तणाव कमी होईल. प्रवासाचा बेत ठरवाल.
सिंह – सर्व सुख असूनही प्रकृतीच्या तक्रारीमुळे उपभोग घेण्यात अडचणी येतील. आर्थिक उलाढाल शक्य होईल. धंदा वाढेल.
कन्या – स्वकर्तृत्वावर यश मिळवता येईल. प्रेमाला चालना मिळेल. घरातील सदस्यांसाठी मोठी खरेदी कराल. तब्येत उत्तम राहील.
तूळ – गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. व्यवसायाच्या कामासाठी संधी शोधता येईल. मैत्रीचा पसारा वाढेल. कोर्ट केस जिंकाल.
वृश्चिक – घरातील प्रश्नांमुळे मनाची द्विधा अवस्था होईल. प्रवासात दिवस चांगला जाईल. नवीन परिचय होईल. वाद मिटवता येईल.
धनु – तुमच्या विचारांशी इतरांचे विचार जुळतीलच असे नाही. तणाव व वाद संभवतो. राग आवरा. वाहन जपून चालवा.

मकर – ठरविलेल्या कार्यक्रमात खूप मोठे यश मिळेल. मित्र-परिवारात वाढ होईल. सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल.
कुंभ – तुमच्या व्यापक विचारांचा प्रभाव इतर व्यक्तींवर पडेल. धंद्यात मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. नोकरवर्गाची मदत मिळेल.
मीन – तणावातून बाहेर पडण्याची युक्ती सापडेल. प्रेमाच्या व्यक्तींचा सहवास मिळेल. घरातील वाद मिटवता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -