घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार १६ जुलै ते शनिवार २२ जुलै २०२३

राशीभविष्य रविवार १६ जुलै ते शनिवार २२ जुलै २०२३

Subscribe

मेष ः- या सप्ताहात बुध मिथुनेत वक्र होऊन दोन दिवसात कर्केत प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. घरात क्षुल्लक मतभेद होईल. शांततेत मार्ग काढा. धंद्यात समोरच्या व्यक्तीचे मत ऐकून घ्यावे लागेल. धंद्यात रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक गैरसमज करून घेतील. कला-क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. कोर्ट केसमध्ये योग्य पद्धतीनेच बोला. घरात जबाबदारी वाढेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. शोध कार्यात धावपळ वाढेल. नोकरीत गुप्त कारवायांचा त्रास होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात दुर्लक्ष करू नये. वाहन नीट चालवा. शुभ दि. १६, २०

- Advertisement -

वृषभ ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यातील कामे आताच करा. मोठे काम मिळवा. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. लोकांना मदत करून तुमचे स्थान बळकट करा. संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत प्रगतीकारक वातावरण राहील. घर, जमीन घेण्याचे ठरवाल. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्ती साथ देईल. शोध कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने आळस न करता ध्येयावर लक्ष द्यावे. कोर्ट केससारखी समस्या संपवा.
शुभ दि. १७, २१

मिथुन ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध वक्र होत आहे. दोन दिवसांनी कर्केत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यात चांगली सुधारणा होईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल. योजनांना मागे ठेवू नका. घरातील समस्या सुटतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नोकरीत वरिष्ठांना खूश ठेवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची चांगली संधी मिळेल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. शोध कार्यात यश मिळेल. कोर्टाच्या कामात जिंकाल. विद्यार्थी वर्गाला ध्येय गाठता येईल. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दि. १८, २२

- Advertisement -

कर्क ः- या सप्ताहात मिथुनेत बुध वक्र होऊन दोन दिवसांनी कर्क राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न आत्ताच करा. संधीचा फायदा घ्या. मागील येणे वसूल करा. घरातील कामे होतील. वाटाघाटीत यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. मागे झालेली चूक सुधारून टाका. वैर भिजत ठेवू नका. पुढे त्यापासून त्रास होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. विशेष कार्य करून दाखवाल. शोध कार्यात यश मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. याकडे लक्ष द्या. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. नोकरीत प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने एकाग्र मनाने अभ्यास करावा. शुभ दि. १६, १९

सिंह ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश, मंगळ, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यातील तणाव वाढू शकतो. तडजोड स्वीकारावी लागेल. नोकर माणसांकडून मनस्ताप, नुकसान संभवते. रागाचा पारा वाढेल. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही कृत्य करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात बोलताना काळजी घ्या. वाहन जपून चालवा. वरिष्ठांचा दबाव राहील. नोकरीत कोणतीही चूक होऊ शकते. दुर्लक्ष करू नका. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून त्रास होईल. घरातील वाद कोर्टात जाऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. शोध कार्यात धावपळ होईल. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी.
शुभ दि. १७, २०

कन्या ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. चर्चा करताना तणाव होण्याची शक्यता आहे. संयमाने वागा. फायदा होणारे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेता येईल. योजनांना गतिमान करता येईल. लोकांपर्यंत तुम्हाला जावे लागेल. त्यामुळेच तुमचे स्थान पक्के होईल. घरातील कामे होतील. घर, जमीन खरेदी विक्रीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. शोध कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अस्थिर न होता ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कोर्ट केस संपवावी.
शुभ दि. १८, २१

तूळ ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. रविवारी तुम्हाला कामाचे दडपण राहील. सोमवारपासून तुमच्या कामाला वेग येईल. धंद्यात वाढ होईल. फायदेशीर योजना नोकरीत मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांची मर्जी राहील. पदाधिकार मिळेल. योजना तयार करून लोकांपर्यंत त्या पोहोचवा, म्हणजे अधिक परिणामकारक परिस्थिती तयार होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळखी होतील. कल्पनाशक्तीचा उपयोग करता येईल. कोर्ट केस यशस्वी होईल. शोध कार्यात वर्चस्व वाढेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. १९, २२

वृश्चिक ः- या सप्ताहात मिथुनेत बुध वक्र होऊन दोन दिवसांनी पुन्हा कर्क राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवे कंत्राट मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकांच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीसाठी चांगली ऑफर येईल. परदेशात जाता येईल. संसारात सुखद संवाद साधता येईल. अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. शोध कार्यात यश मिळेल. परीक्षेसाठी उत्तम तयारी विद्यार्थ्यांना करता येईल. शुभ दि. १६, १८

धनु ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश, मंगळ, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात समस्या येईल. तुमचा अंदाज चुकू शकतो. कामगार त्रस्त करतील. कामे रेंगाळतील. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला सहनशीलता ठेवण्यासाठी गरज आहे. गुप्त कारवाया होतील. विरोधक संधीचा फायदा घेऊन तुम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. संसारात कामे वाढतील. धावपळ होईल. जवळच्या व्यक्तीचा विरह संभवतो. स्वतःची काळजी घ्या. प्रवासात घाई करू नका. स्पर्धेत मेहनत पडेल. वाद वाढवू नका. कोर्ट केसमध्ये तणाव होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी नम्र रहावे. शुभ दि. १७, १९

मकर ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश, चंद्र, गुरू प्रतियुती होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. विविध अनुभव येतील. धंद्यात जम बसवा. आत्ताच चांगली संधी मिळू शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वादाचे प्रसंग येतील. खूप लोकांना तुमचे स्पष्ट बोलणे आवडते. ते खरे असते म्हणून लोकप्रियता मिळते. प्रेमाने सर्वांना एकत्र करा. संसारातील कामे होतील. मुले, जीवनसाथी यांना खूश करता येईल. घर, जमीन खरेदी-विक्री होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केस लवकर संपवा. शोध कार्यात यशस्वी व्हाल. नोकरीत फायदेशीर बदल होईल. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग मिळेल. शुभ दि. १८, २०

कुंभ ः- या सप्ताहात मिथुन राशीत बुध वक्र होऊन पुन्हा कर्क राशीत प्रवेश करीत आहे. मंगळ, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. नातलगांसाठी धावपळ करावी लागेल. खर्च होईल. धंद्यात मंदी जाणवेल. भागीदार कुरबुर करेल. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. राजकीय-सामाजिक कार्यात छोटीशी चूक मोठी करून दाखवली जाईल. अपमान करण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. सहकारी वर्गाची मदत मिळणे कठीण होईल. स्पर्धेत कष्ट पडतील. कोर्ट केसमध्ये जास्त विश्वास ठेवू नका. शोध कार्यात दमछाक होईल. वरिष्ठांचा दबाव राहील. शुभ दि. १९, २१

मीन ः- या सप्ताहात कर्क राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. मोठे काम मिळेल. कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलताना नम्रता ठेवा. निष्कारण दादागिरीने वागल्यास तुम्ही एकटे पडाल. त्यामुळे प्रगती कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्याला वेग देता येईल. लोकांना सहाय्य करा. समस्या सोडवा. अधिकार मिळेल. घरातील कामे होतील. घर, जमीन खरेदी-विक्री करता येईल. शेअर्सचा अंदाज दिसेल. कला-क्रीडा स्पर्धेत वर्चस्व दिसेल. कौतुक होईल. नोकरीत फायदा होईल अशी सुधारणा करू शकाल. शोध कार्यात यशस्वी व्हाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. २०, २२

- Advertisment -