राशीभविष्य रविवार २४ जुलै ते शनिवार ३० जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात किरकोळ अडचण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला तडजोड करावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला काही ठिकाणी तटस्थपणे राहून तडजोड करावी लागेल. विचार मांडा, पण आग्रह धरू नका. जवळच्या लोकांना नीट समजून घ्या. घरातील समस्येवर उपाय शोधता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. नवीन ओळखी होतील. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. वरिष्ठांच्या बरोबर जमवून घ्यावे लागेल. कोर्टाच्या कामात योग्य तेच बोला, सल्ला घ्या. शोधकामात दिशाभूल होऊ शकते.
शुभ- २४, २५

वृषभ ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्यात चांगला जम बसवता येईल. प्रयत्न करा नवे कामही मिळेल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती द्या. वेळेला महत्त्व द्या. लोकप्रियता वाढवा. त्यांच्या समस्या सोडवा. मुले प्रगती करतील. कला क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. नोकरीत वर्चस्व वाढेल असे काम करा. कोर्ट केस संपवा. सप्ताहाच्या शेवटी किरकोळ वाद व अडचण येऊ शकते. शोधकार्यात प्रगती कराल. विद्यार्थी वर्गाने सत्याची कास धरून अभ्यासाचे प्रयत्न करावेत.
शुभ दि.- २४, २७

मिथुन ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. मोठे काम मिळवता येईल. प्रयत्नांचा जोर वाढवा. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांना खूश करता येईल. नवी योजना पूर्ण करण्याची तयारी करा. दौर्‍यात यश मिळेल. मागील येेणे वसूल करा. संसारात सुखद समाचार मिळेल. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. परदेशात जाण्याची संधी येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला जास्त मेहनत घेतल्यास मोठे यश मिळेल. शोधकार्य पूर्ण होईल.
शुभ दि. – २६, २८

कर्क ः- तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्याला कलाटणी मिळेल. समस्या सोडवता येईल. गुंतवणूक करणारे भागीदार मिळतील. मोठे कंत्राट मिळवा. संसारातील तणाव कमी होईल. घर, जमीन खरेदी-विक्री करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात चुका सुधारून चांगले भरीव कार्य करता येईल. लोकसंग्रह वाढवा. पुढच्या यशासाठी प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी कराल. पुरस्कार मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. शोधकार्यात यश मिळेल. विचारांना दिशा देता येईल. त्यामुळे विद्यार्थी प्रगती करू शकेल.
शुभ- २५, २६

सिंह ः- या सप्ताहात कर्क राशीत शुक्र प्रवेश. चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. एखाद्या छोट्या व्यक्तीकडूनसुद्धा तुमचे अडलेले काम होऊ शकेल. धंद्यात कोणताही व्यवहार सावधपणे करा. गुंतवणूक करताना फसाल. घरात क्षुल्लक तणाव होईल. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. राजकीय-सामाजिक कामात चर्चेतून गैरसमज होईल. वाद होईल. कला-क्रीडाक्षेत्रात मेहनत घ्या. जास्त अपेक्षा ठेवू नका. नोकरीत बेसावधपणे निर्णय घेऊ नका. अडकाल. शोधकार्यात धावपळ होईल. रागावर ताबा ठेवा. कोर्ट केस कठीण असेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे मत व्यक्त करावे.
शुभ दि. – २७, २९

कन्या ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात आळस न करता समस्या सोडवा. कमीचे काम होऊ शकेल. मोठे कंत्राट मिळवून ठेवा. नोकरीत बदल करता येईल. वरिष्ठ खूश होतील. राजकीय-सामाजिक कार्यात दूरदृष्टिकोनातून निर्णय घ्या. संसारात आनंदाची बातमी मिळेल. कार्याची मांडणी करा. वेळेला महत्त्व द्या. संसारात आनंदाची बातमी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमत्कारजन्य कामगिरी करून दाखवाल. प्रसिद्धी वाढेल. कोर्ट केस संपवा. सप्ताहाच्या शेवटी अडथळा येईल. विद्यार्थ्यांना चांगला मार्ग निवडता येईल.
शुभ दि. – २८, ३०

तुला ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश. सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात जम बसेल. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. थकबाकी वसूल करा. संसारात चांगली घटना घडेल. तुमचा उत्साह वाढेल. राजकीय-सामाजिक कार्याला गती देता येईल. लोकप्रियतेत वाढ होईल. स्वतःचे स्थान निर्माण करू शकाल. नोकरी मिळेल. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे शिक्षणात पुढे जाता येईल. विदेशात जाता येईल.
शुभ दि. – २४, २६

वृश्चिक ः- या सप्ताहात कर्क राशीत शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. कामगारांकडून थोडा त्रास होऊ शकतो. नोकरीतील तणाव कमी होईल. तुमचे बोलणे जाचक वाटू शकते. राजकीय-सामाजिक कार्यात अधिक वेगाने प्रगती करता येईल. पुढील यशाचा मार्ग खुला होईल. लोकांच्या समस्या सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख महत्त्वाची ठरेल. संसारात चांगली घटना घडेल. तणाव कमी होईल. कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी अडचण येईल. शोधकार्य पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला अपयशाची भीती नाही. वेगाने पुढे जाता येईल.
शुभ दि. – २५, २९

धनू ः- या सप्ताहात कर्क राशीत शुक्र प्रवेश. सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात समस्या येईल. भागीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागेल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. वाटाघाटीत नाराजी होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. लोकांची नाराजी होऊ शकते. दौर्‍यात काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. कला-क्रीडा स्पर्धेत टिकून राहणे कठीण आहे. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना सावध रहा. साडेसाती सुरू आहे. कोर्ट केस जिंकणे कठीण आहे. शोधकार्यात दिशाभूल होईल. वरिष्ठांना दुखवू नका. विद्यार्थी वर्गाने बेफाम वागू नये. सल्ला ऐकावा.
शुभ दि. – २९, ३०

मकर ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश. सूर्य बुध युती होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. साडेसातीत माणसाला खूप शिकावयास मिळते. वेगळेच अनुभव येतात. धंद्यात सुधारणा करता येईल. नवी दिशा मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला योग्य विषयांची मांडणी करून कार्य केले पाहिजे. भविष्याकडे लक्ष ठेवा. जिद्द ठेवा. मोठ्यांचा सल्ला घेता येईल. घरातील तणाव मिटेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष यश मिळवता येईल. नोकरीत प्रभाव दाखवा. शोधकार्यात प्रगती होईल. कोर्ट केस लवकर संपवा. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल.
शुभ दि. – २६, २९

कुंभ ः- या सप्ताहात कर्क राशीत शुक्र प्रवेश. चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. अडचण होईल, परंतु माणसाचे मन स्थिर राहिल्यास त्यावर उपाय शोधता येतो. धंद्यात तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. नोकरीत कायद्याचे पालन करूनच निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा दबाव राहील. आपसात क्षुल्लक वाद संभवतो. प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा तटस्थपणे प्रसंग अभ्यासा. कला-क्रीडा क्षेत्रात मैत्रीत दुरावा संभवतो. दौर्‍यात खाण्याची काळजी घ्या. घरातील व्यक्तींची नाराजी होऊ शकते. विद्यार्थी वर्गाच्या मनात घेतलेल्या निर्णयाबद्दल शंका येईल.
शुभ दि. – २५, २७

मीन ः- या सप्ताहात कर्केत शुक्र प्रवेश, बुध शुक्र युती होत आहे. धंद्यात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. काम वाढेल. अडचण दूर करू शकाल. रविवारनंतर तुमच्या राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. मोठ्या यशासाठी आताच प्रयत्न करा. लोकांच्या मनात स्थान निर्माण करा. घरगुती कामे होतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी काम कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. कोर्ट केस जिंकाल. विद्यार्थ्यांची प्रगती वेगाने होईल. नोकरी लागेल. परदेशात जाल. प्रवास सुखकारक होईल.
शुभ दि.- २६, ३०