राशीभविष्य रविवार ३० जानेवारी २०२२ ते शनिवार ५ फेब्रुवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- रविवार धंद्यात एखादी समस्या होईल. घरातील खर्च वाढेल. धावपळ करावी लागेल. सामाजिक कार्यात मतभेद होईल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्याला सोमवारपासून वेग येईल. तुमचे महत्व वाढेल. धंद्यात गोड बोलून काम करून घेता येईल. नातलगांच्या मदतीला जावे लागेल. घरगुती कामे करावी लागतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात आशादायक वातावरण राहील. संशोधन कार्यात मदत मिळेल. संशोधनाचा धागा मिळेल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी जोरदार तयारी करावी. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. शुभ दि. ३१, १

वृषभ ः- रविवार महत्वाचे काम करून घ्या. धंदा वाढेल. थकबाकी मिळवा. घरातील काम करण्यात यश मिळेल. पाहुणे येतील. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. घरातील गैरसमज, ताण कमी करता येईल. विचारांची देवाण-घेवाण करता येईल. धंद्यात सावध रहा. मोठे काम हातचे जाऊ देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर एखादे प्रकरण रोखले जाईल. तुमच्या कामाचा संशय घेतला जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात नमते धोरण घ्यावे लागेल. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. संशोधनास विलंब होईल. विद्यार्थी वर्गाने खोटे बोलू नये. अभ्यास करावा तरच यश मिळेल. शुभ दि. २, ३

मिथुन ः- रविवार नातलगांची भेट होईल. धंद्यात चांगला जम बसवता येईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धा जिंकाल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला तुमचे कार्य सिद्ध करून दाखवता येईल. लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. धंद्यात मोठ्या लोकांच्या ओळखीने काम वाढवता येईल. कर्जाचे काम करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात बुधवार, गुरुवार अडचणी येतील. विरुद्धलिंगी व्यक्तीवर जास्त भरवसा ठेऊ नका. संसारात जीवनसाथीची मर्जी राखता येईल. नोकरीत ताण कमी होईल. संशोधन कार्यास नापासाची दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने ध्येयावर लक्ष देऊन अभ्यास करावा. शुभ दि. ३१, १

कर्क ः- रविवार आत्मविश्वासने कठीण काम पूर्ण करता येईल. नम्रता ठेवा. सामाजिक कार्य होईल. धंद्यात लक्ष द्या. मेहनतीचा फायदा मिळेल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्वाचा निर्णय घेताना सर्वांचा विचार घ्या. अरेरावी करण्यापेक्षा मैत्रीने प्रश्न सोडवा. धंद्यात चांगले काम मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात हिम्मत हारू नका. प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल. कोर्ट केसमध्ये सावध रहा. संशोधनाच्या कामाला अडचणींवर मात करू शकाल. कुणाला कमी समजू नका. परीक्षेसाठी नियमित अभ्यास करावा. शुभ दि. ३०, २

सिंह ः- रविवार तुम्ही ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करता येईल. धंद्यात फायदा होईल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. महत्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यातील समस्या सोडवता येईल. भागिदाराला समजून घेता येईल. तुमचे विचार घरात स्पष्टपणे मांडा. वडील माणसे पाठीशी असतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. तुम्हाला भिडस्तपणा होऊन चालणार नाही. कोर्टाच्या कामात बुधवार, गुरुवार सावध रहा. विरुद्धलिंगी व्यक्ती आरोप करेल. संशोधनाच्या कामात दुवा सापडेल. विद्यार्थ्यांनी खोटे बोलू नये. स्वतःचे भविष्य घडवावे. चांगली संगत ठेवावी. शुभ दि. ३०,३१

कन्या ः- रविवार तुम्ही ठरविलेला कार्यक्रम पद्धतशीरपणे यशस्वी करू शकाल. धंदा वाढवा. कुणालाही अरेरावीने वागवू नका. धनु राशीत बुध प्रवेश, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात किरकोळ मतभेद होतील. त्याला जास्त महत्व देऊ नका. आत्मविश्वास वाढेल. धंद्यात नवा पर्याय मिळेल. राहिलेले पैसे वसूल करा. नोकरीचा हुद्दा वाढेल. घरातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. तरीही कमतरता वाटेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. संशोधन कार्यास स्वतःची बुद्धी वापरा; पण दुसर्‍याचे विचार ऐकून घ्या. शुभ दि. ३१,१

तुला ः- रविवार तणावाचा राहील. दुसर्‍यांनी मांडलेले विचार स्वतःला पटले तरच हो म्हणा. दूरदृष्टीकोन ठेवा. धंद्यात वाद करू नका. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची योजना नेटाने पुढे नेता येईल. मोठ्या व्यक्ती तुमच्या विचाराने कामाचे स्वागत करतील. पदाधिकार मिळेल. धंद्यात नवा विचार उपभोगता येईल. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टाच्या कामात यशस्वी व्हाल. आरोप चुकीचा ठरेल. नोकरी मिळेल. संशोधनात प्रगती होईल. वरिष्ठांना खूश करता येईल. विद्यार्थी वर्गाने श्रम घेतले तर त्याचे उत्तम फळ त्यांना मिळेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहता येईल. शुभ दि. १,२

वृश्चिक ः- रविवार तुमचा अंदाज बरोबर येईल. महत्वाची भेट घेता येईल. चर्चा सफल होईल. धंद्यात वाढ करता येईल. उत्साह वाढेल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचे राजकीय-सामाजिक क्षेत्रातील धोरण बदलल्यामुळे लोकांना आशा वाटतील. दुखावलेल्यांना जवळ करता येईल. धंद्यात आळस न करता काम वाढवता येईल. ओळखीचा फायदा होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. तुमचे कौतुक होईल. नवीन कल्पना कृतीत उतरवता येईल. मोठी खरेदी कराल. कोर्ट केसमध्ये सोमवार, मंगळवार तणाव होईल. संशोधन कार्यात यश मिळेल. नवा परिचय होईल. परीक्षेसाठी नियमितपणाने अभ्यास करा. शुभ दि. ३, ४

धनु ः- रविवार तुमचा उत्साह वाढेल. आप्तेष्टांची भेट होईल. खरेदी कराल. धंद्यात सुुधारणा करावी लागेल. तुमच्याच राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आता तुम्ही हा दोष पुसून टाका. कार्याला महत्व द्या. धंद्यात लक्ष द्या. दुसर्‍यांच्या भरवशावर न राहता स्वतः काम करा. घरातील प्रश्न सोडवणे सर्वस्वी दुसर्‍यावर अवलंबून राहील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. स्पर्धा करणारे वाढतील. मैत्रीत बुधवार, गुरुवार तणाव संभवतो. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कोर्ट केसमध्ये भावनेपेक्षा कर्तव्य पहा. विद्यार्थ्यांनी मोठ्या परीक्षेसाठी चांगला अभ्यास करावा. शुभ दि. ३१, १

मकर ः- रविवार मुद्याचे भाषण करा. तुमच्या कार्याचा आढावा घ्या. कमतरता भरून काढा. धंद्यात वाढ करू शकाल. लोकप्रियता मिळेल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात मोठा निर्णय घेता येईल. तुमच्या कामातील चूक दाखवली जाईल. विचारपूर्वक विधान करा नाहीतर तुम्हीच अडचणीत याल. योग्य गुरु शोधा. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. व्यसन व मोह टाळा. ध्येय गाठा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात प्रगती करावी. नोकरीत कायद्यात राहून निर्णय घ्या. संशोधनात कटकटी होऊ शकतात. शुभ दि. ३०, ३१

कुंभ ः- रविवार अचानक खर्च वाढेल. डोळ्यांना त्रास होऊ शकतो. धंद्यात फायदा होईल. वाहन जपून चालवा. थकवा वाटेल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. या सप्ताहात अडचणीवर मात करून मोठा विजय प्राप्त कराल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक सहाय्य मिळेल. धंद्यात मोठा प्रकल्प उभारता येईल. कर्जाचे काम करून घेता येईल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरीत चांगला बदल होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. कोर्ट केस जिंकाल. संशोधनात वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. विद्यार्थी मनाप्रमाणे मार्क घेतील. वास्तु, वाहन खरेदी कराल. शुभ दि. १, २

मीन ः- रविवार घरातील व्यक्तीसाठी नवे काही कराल. धंद्यात मोठी वाढ करता येईल. नवीन ओळख होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धनु राशीत बुध, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही कार्यपद्धती तयार करा. योजनांना महत्व द्या. प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वाद वाढवू नका. डोके शांत ठेवल्यास वाईट घडणार नाही. नोकरी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवी संधी शोधता येईल. मित्र मिळतील. कोर्ट केस संपवता येईल. प्रयत्न करा. संशोधनाच्या कामात पुढे जाल. खंबीरपणा दिसेल. विद्यार्थी वर्गाने विचलित न होता अभ्यास करावा. शुभ दि. २, ३