घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार ३१ मार्च ते शनिवार ६ एप्रिल २०२४

राशीभविष्य : रविवार ३१ मार्च ते शनिवार ६ एप्रिल २०२४

Subscribe

मेष ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुम्हाला ग्रहांचा पाठिंबा वाढतो आहे. मनोबलपण वाढेल. धंद्यातील तणाव, समस्या कमी होईल. त्यामुळे प्रयत्न करा. नवे काम मिळेल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. सहकारी संकटात मदत करतील. राजकीय-सामाजिक कामात तुमच्या मुद्यांना पाठिंबा मिळेल. थोडी तडजोड करावी लागली तरी तुमचे पारडे जड राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. घरातील कामे होतील. मुलांची प्रगती आनंद देईल. नोकरीत वरिष्ठांना मान द्या. कामे होतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. राजकीय क्षेत्रात मनाप्रमाणे बदल करता येईल. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी. परीक्षेत यश मिळेल. अरेरावी करू नये. शुभ दि. ३१, ४

वृषभ ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या कामास वेळ जास्त लागेल. अरेरावी करून कामे करता येणार नाहीत. गोड बोलूनच राहावे लागेल. धंद्यात फसगत होईल. जास्त मोह ठेवू नका. खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात कटकटी होतील. धावपळ करावी लागेल. तुमच्या कामाचा व्याप वाढेल. सहकारी मदत करतील. नोकरीत कायद्याचे पालन करा. घाईत निर्णय घेऊ नका. संसारात क्षुल्लक नाराजी होईल. महत्त्वाची वस्तू सांभाळून ठेवा. संशोधनाच्या कामात दिशाभूल होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवे मित्र मिळतील. कामात मेहनत जास्त होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेची जोरदार तयारी करावी. शुभ दि. १, ५

- Advertisement -

मिथुन :- या सप्ताहात तुमच्याच राशीत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला छोट्या अडचणी येतील, पण त्यानंतर तुमची कामे पूर्ण होतील. धंद्यात जम बसेल. मोठे प्रोजेक्ट सुरू होऊ शकेतील. थकबाकी मिळवा. मोठ्या लोकांच्या ओळखीने फायदा होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. वरिष्ठांचा सल्ला नोकरीत मानावा लागेल. प्रमोशन मिळू शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात नामांकन होईल. पुरस्कार मिळेल. घरात शुभ घटना घडेल. मुलांची प्रगती होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. खरेदी-विक्रीत नफा होईल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने पैसे गुंतवा. फायदा होईल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा ठरवता येईल. शुभ दि. २, ६

कर्क ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुम्ही कोणत्याही कामात यश मिळवू शकाल. उत्साह व आत्मविश्वास फारच वाढेल. वाहन जपून चालवा. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय-सामाजिक कार्यात संतापजनक घटना घडू शकते. तुम्ही सावधपणे बोला. तुमचे वर्चस्व वाढेल. लोकप्रियता मिळेल. गुप्त कारवायांना कमी समजू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध व्हाल. नोकरी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. कोर्ट केस संपवता येईल. नवीन लोकांची ओळख होईल. फायदा करून घेता येईल. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. योग्य दिशा मिळेल. शुभ दि. ३१, ३

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात निर्णय घ्या. वाटाघाटीत यश मिळेल. तुमचा प्रभाव पडेल. धंद्याला चांगला उठाव येईल. मित्रांची मदत काम मिळवण्यात होऊ शकेल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. कोणतेही कठीण काम हाती घेऊन पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. अहंकाराने वागू नका. गर्व करू नका. गुप्त कारवायांना कमी समजू नका. घरातील सदस्यांसोबत सर्व मुद्दे नीट मांडा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक भेटतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेला अभ्यासक्रम एकाग्रतेने पूर्ण करावा. शुभ दि. १, ४

कन्या ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात तडजोड करण्याची वेळ येईल. नोकर वर्गाशी प्रेमाने वागा. कामगार, भागीदार यांना कमी लेखू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढत असले तरी त्यावर आक्षेप घेतला जाईल. जवळच्या लोकांना फिरवण्याचा प्रयत्न विरोधक करतील. शांत राहा. रागावर ताबा ठेवा. संकटातून मार्ग निघेल. कोणताही आर्थिक व्यवहार करताना बेफिकीर राहू नका. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांना दुखवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात गैरसमज होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. कोर्ट केसमध्ये अडचणी येतील. कुठेही अतिशयोक्ती नको. कुटुंबात जबाबदारी वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. शुभ दि. २, ५

तूळ ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश होत आहे. तुमच्या प्रत्येक कामाला गती मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. धंद्यात मोठ्या लोकांची मदत मिळेल. मोठे कामही मिळेल. कर्जाचे काम करून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. लोकांचे सहकार्य मिळेल. पदाधिकार मिळेल. लोकांची कामे मार्गी लावा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल, नावलौकिक वाढेल. नवीन ओळखी होतील. घरात शुभ समाचार मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नोकरीत बढती, बदलीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. घर, वाहन, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दि. ३, ६

वृश्चिक ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश होत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. तुम्ही कुठेही अहंकाराने वागू नका. नम्रपणे तुमचे मत मांडा. आग्रह धरू नका, पण प्रयत्न करा. तरच तुमची धंद्यातील व इतर कामे होतील. नवीनच ओळख झालेल्या माणसांवर जास्त विश्वास टाकू नका. मोह आवरा. व्यसनाने नुकसान होईल. कोणतेही व्यसन करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार ताण-तणाव होऊ शकतो. वाटाघाटीत समस्या येईल. मित्रपक्षाचे ऐकावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत जास्त होईल. नोकरीत चुकीचे काम करू नका. लक्ष देऊन काम करा. संशोधनात गोंधळ होईल. मन स्थिर ठेवा. शुभ दि.३१, २

धनु ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. अडचणीतून मार्ग निघेल. धंदा वाढेल. नवीन काम मिळेल. धावपळ होईल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव असला तरी गुप्त शत्रू कट-कारस्थाने करतील. संताप होईल. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. घरगुती कामे करण्यास वेळ लागेल. नोकरीत कायद्यानुसार निर्णय घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीपर्यंत पोहोचाल. विद्यार्थ्यांनी नम्र राहावे. परीक्षेचा अभ्यास चांगला करावा. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक भेटतील. संशोधनाच्या कामात यश उशिरा मिळेल. कामात वरिष्ठ तुमची बाजू घेतील. शुभ दि. १, ३

मकर ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. धंद्यात कायद्यासंबंधी किरकोळ उणीव राहील. मोठे काम मिळवता येईल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. तुमची मदत इतरांना झाल्याने तुमचे आभार मानले जातील. टीकाही होईल. टीकेकडे दुर्लक्ष करा. तुमचे काम प्राणाणिकपणे करत राहा. लोकांची कामे मार्गी लावा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल, नावलौकिक वाढेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. संशोधनाच्या कामात महत्त्व वाढेल. घरातील व्यक्तींची मर्जी राखावी लागेल. संगत उत्तम ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. शुभ दि. २, ४

कुंभ ः- या सप्ताहात मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश होत आहे. अचानक कामे वाढतील. धावपळ होईल. अडचणी येतील. त्यातून मार्ग काढावा लागेल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. थकबाकी मिळवा. रागावर ताबा ठेवा. शांततेतून मार्ग काढा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधकांना शह द्यावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. नोकरीत वरिष्ठांची कामे पूर्ण करा. संशोधनाच्या कामात यश येईल, पण वेळ लागेल. चांगली संगत ठेवावी. चंचलपणा टाळावा. व्यसनाच्या नादी लागू नका. विद्यार्थ्यांनी चिडचिड करू नये. विद्यार्थ्यांना पुढे जाता येईल. मेहनत करा. मोठ्यांचे ऐकावे. शुभ दि. ३, ५

मीन ः- या सप्ताहात मिथुन राशीत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा प्रत्येक दिवस उत्साहाचा जाईल. कामे होतील. धंदा तेजीत चालेल. नवीन माणसे कामासाठी मिळतील. घरात आनंदी वातावरण असेल. अडलेले काम पूर्ण करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. अधिकार प्राप्ती होईल. लोकांची कामे प्रामाणिकपणे करा. अहंकाराला थारा देऊ नका. गर्व करू नका. घर, वाहन, जमीन खरेदी-विक्री करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल, प्रसिद्धी मिळेल. मोठे काम मिळेल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना नवा मार्ग मिळेल. योग्य अभ्यास निवडता येईल. परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. ४, ६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -