घर लाईफस्टाईल झाकणाचा असा करा reuse

झाकणाचा असा करा reuse

Subscribe

प्लास्टिकच्या बॉटलमधून आपण कोल्ड ड्रिंक, पाणी आणि कॉफी सारख्या पदार्थांचे सेवन करतो. मात्र आपले त्यामधील पदार्थ पिऊन झाल्यानंतर त्याच्या बॉटल्स फेकून देतो. अशातच तुम्ही कधी बॉटलच्या झाकणांचा वापर विविध गोष्टींसाठी कधी केलायं का? याच बद्दलच्या खास टीप्स आपण पाहूयात.

बॉटलच्या झाकणांनी सजवा भिंत

- Advertisement -


बॉटलच्या झाकणाने भिंत सजवण्यासाठई तुम्ही कोणत्याही प्रकारचे झाकणं घेऊ शकता. या झाकणांना पेटिंग करुन त्यावर फुल,चेहरा अथवा एखादी नक्षी काढू शकता.

वॉल हँगिंग बनवा

- Advertisement -


बॉटलच्या झाकणाचा वापर तुम्ही वॉल हँगिगच्या रुपात वापर करू शकता. वॉल हँगिंग तयार करण्यासाठी विविध झाकणं घेऊन त्यावर छिद्र करून दोरीने बांधून वॉल हँगिग तयार करू शकता.

इअर रिंग्स तयार करा


आजकाल प्रत्येकाला काही वस्तू रियूज करायला फार आवडतात. अशातच तुम्ही झाकणापासून इअर रिंग्स तयार करू शकता. झाकणाला वेगळा लूक देण्यासाठी कागद किंवा लिक्विड कलरचा वापर करू शकता.

कँन्डल बनवा


बॉटलच्या झाकणाचा वापर तुम्ही कँन्डल बनवण्यासाठी करू शकता. यासाठी आधी तुम्हाला प्लास्टिक नव्हे तर स्टीलचे झाकणं वापरावे लागेल.


हेही वाचा- जुन्या टोपल्यांपासून बनवा श्री कृष्णासाठी पाळणा

- Advertisment -