घरलाईफस्टाईलफॅशन 'पलाझो' ची !

फॅशन ‘पलाझो’ ची !

Subscribe

मोकळ्या ढाकळ्या 'पलाझो' सध्या फॅशन इन आहे. वेगवेगळ्या प्रकारात मिळणाऱ्या या पलाझो ऑफिस गोईंग पासून ते कॉलेजपर्यंत सगळ्याच तरुणी परिधान करतात. आज आपण वेगवेगळ्या पलाझो पॅंट्सची माहिती घेऊया.

फुल लेंथ पलाझो

पलाझो पॅंटमधील हा बेसिक प्रकार आहे. प्लेन पॅटर्न आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये या पॅंट्स मिळतात. यामधील इंडिगो कलर्सना अधिक पसंती असते. कारण बऱ्याच कुर्तींवर इंडिगो कलर्स चांगले दिसतात. घोळदार बॉटम असल्यामुळे कुर्तीला एक वेगळा लुक येतो.

थ्री फ्रोर्थ पलाझो

नी लेंथपेक्षा थोड्या लांब अशा या थ्री फोर्थ पलाझो असतात. हा प्रकारही तसा नवीन नाही. पण सध्या या प्रकारच्या पॅंट्समध्ये वेगवेगळे प्रकार आले आहेत. जे तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या टॉपवर घालून इंडोवेस्टर्न लुक मिळवू शकता. जर तुम्ही प्रिटेंड शॉर्ट कुर्ता परिधान केला असेल तर प्लेन पलाझो त्यावर बेस्ट ऑप्शन आहे. फक्त प्रिंटेड कुर्ता असेल तर प्लेन पलाझो आणि प्लेन टॉप असेल तर प्रिंटेड पलझो असे समीकरण उत्तम दिसेल.

- Advertisement -

स्कर्ट फ्लेअर पलाझो

पलाझोमधील हा प्रकार स्कर्टचा लुक देतो. याचा बॉटम इतर पलाझोसारखा सरळ सरळ नसतो तर त्यामुळे याचा फ्लेअर स्कर्टसारखा दिसतो. हा प्रकार सध्या लोकप्रिय ठरत आहे. कारण या प्रकारातील डिझाइन्स खुपच वेगळ्या आहेत. इंडोवेस्टर्न डिझाइन्स (पिसली, अॅवस्ट्रॉक्ट), राजस्थानी डिझाइन (हत्ती, घोडे), पोल्का डॉट अशा वेगवेगळ्या डिझाइन्स यात दिसतात. हा प्रकार थ्री फोर्थ लेंथमध्ये उपलब्ध आहे. यावर क्रॉप टॉप, टी बॅक टॉप, सिंगलेंट टॉपवर चांगले दिसतात. यावर तुम्ही एखादी हेवी ज्वेलरी घातली तर पलाझोचा लुक अधिक उठून दिसतो.

पलाझो परिधान करताना, ही काळजी घ्या :-

१ पलाझो हा लूज पॅंटचा प्रकार असल्यामुळे वर कोणताही टॉप घालताना त्याची फिटिंग चांगलीच हवी.

- Advertisement -

२ प्रिटेंड टॉपवर प्रिटेंड पलाझो शक्यतो टाळा.

३ उंची कमी असेल तर फुल लेंथ पलाझोपेक्षा थ्री फोर्थ लेंथ पलाझो निवडा.

४ स्कर्ट फ्लेअर पलाझो पॅंटमधील प्रिटेंड पॅंट निवडताना त्यावर व्ही शेप नेक टीशर्ट, राउंड नेक टीशर्ट जास्त चांगले दिसतात. त्यावर ऑक्साईड प्रकारातील ज्वेलरी शोभून दिसेल.

५ पलाझोवर फ्लॅट चप्पल घालायच्या असतील तर फॅन्सी कोल्हापूरी चपलांची निवड करा. हिल्समध्ये वेज हिल्समधील चप्पल यावर चांगल्या दिसतील. पेन्सिलहिल्स, शूज घालणे टाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -