घरताज्या घडामोडीHealth Tips : थंडीच्या दिवसात 'शिंगाडा' खाणे ठरते आरोग्यदायी ; जाणून घ्या...

Health Tips : थंडीच्या दिवसात ‘शिंगाडा’ खाणे ठरते आरोग्यदायी ; जाणून घ्या फायदे

Subscribe

थंडीमध्ये आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण आपल्या खाण्या-पिण्यामध्ये बदल करतात. हिवाळ्यात जशा आरोग्याच्या समस्या वाढतात तसेच, त्यावर उपयुक्त ठरणाऱ्या फळे,भाज्याही बाजारामध्ये उपयुक्त ठरतात.थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून, तिला ‘वॉटर चेस्‍टनट’ असेही म्हणतात.हे फळ पावसाळ्यात उगवतं आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात विक्रीसाठी येतं.

  • या शिंगाड्यामध्ये कमी कॅलरीज आढळतात आणि त्यात प्रथिने, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 आणि रिबोफ्लेविनसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर देखील आढळते. जे दीर्घकाळ पोट भरण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • याशिवाय या फळामुळे वजन कमी होण्यास मदत होतेय.अनेकजण ते उकळून खातात. अनेकांना ते कच्चे खायलाही आवडते.
  • एखाद्याला जर निद्रानाशाचा त्रास असेल तर, या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला शिंगाडं फायदेशीर आहे.
  • शिंगाड्यामुळे घशाच्या अनेक समस्या दूर होतात.याशिवाय घसा खवखवणे यापासूनही सुटका मिळेते.कारण शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात.
  • पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी शिंगाड्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.
  • मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यावर शिंगाडा फायदेशीर आहे.
  •  शिंगाडा खाल्ल्याने पायाच्या तळव्यांच्या भेगा भरुन येतात.

हे ही वाचा – green peas-हिरव्या वाटाण्याचे अतिसेवन म्हणजे आजाराला आमंत्रण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -