घरलाईफस्टाईलपावसाळ्यात हाडांच्या समस्या कशा हाताळाव्या

पावसाळ्यात हाडांच्या समस्या कशा हाताळाव्या

Subscribe

पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात वाहनांना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असते. अशावेळी अपघात होऊन हाड फ्रॅक्चर होतात अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी.

पावसाळा सुरू झाल्यानंतर सगळे वातावरणच बदलते. हिरवाई, आल्हाददायक तापमान, लाँग ड्राईव्हला जाऊन चहा आणि गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेण्याच हा ऋतू असतो. या ऋतूसोबत पोटाचे विकार होतात, त्याचबरोबर आपल्या लिगामेंट्सला इजा होण्याची आणि हाडांना, विशेषत: अपघाताशी संबंधित इजा होण्याची शक्यता अधिक असते.

पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात वाहनांना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असते. आपल्या रस्त्यांची अवस्था पाहता निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाड्या चालवल्यामुळे त्या घसरण्याची शक्यता असते. अशावेळी बहुतेक प्रकरणांमध्ये हाडे फ्रॅक्चर होणे ही मुख्य इजा असते. स्नायू आणि लिगामेंटला होणारी इजा म्हणजे मुरगळणे, जखम, फाटणे इत्यादी, तसेच सांधा निखळणे सुद्धा शक्य असते. पावसाळ्यात अनेकदा सांधेदुखी आणि इतर आधीपासून असलेले आजार बळावतात. बदललेल्या वातावरणाचा आपल्या शरीरातील द्रवांवर परिणाम होतो आणि स्नायूंवर आणि लिगामेंट्सवर अतिरिक्त ताण पडून वेदना होतात.

- Advertisement -

फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी प्लास्टर घालावे लागते आणि त्यात अवयवाची हालचाल करता येत नाही. या कालावधीत रुग्णाला ३४ आठवडे हालचाल करायला परवानगी नसते किंवा किमान हालचाल करता येते. इतर काही गंभीर प्रकरणांमध्ये फ्रॅक्चर झालेल्या भागात प्लेट्स, रॉड्स आणि स्क्रू लावावे लागतात. अशा परिस्थिती रुग्ण पूर्ण बरा होण्यासाठी अधिक कालावधी लागतो.

फ्रॅक्चर बरे करण्यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवावेत :

  • फ्रॅक्चर झालेला हात किंवा पाय तुमच्या हृदयाच्या पातळीच्या वरील बाजूस ठेवा. जेणेकरून प्लास्टरच्या आतील बाजूस सूज येऊ नये. कारण तो एक घट्ट आधार असतो. जो शरीरातील द्रव आणि रक्त यांच्या मुक्त वहनावर निर्बंध आणतो. आधारासाठी एक किंवा दोन उशा घ्या.

  • उपचारांच्या सुरुवातीच्या दिवसात फार हालचाल करू नका. पुरेशी विश्रांती घ्या.

  • तुमच्या बोटांच्या आणि पायाच्या बोटांच्या सौम्य हालचालींविषयी डॉक्टरांशी चर्चा करा, जेणेकरून रक्ताभिसरणाला मदत होईल.

  • त्वचेच्या रंगामध्ये होणारे बदल, दुर्गंधी आणि फ्रॅक्चर झालेल्या भागात जाणवणारा ओलसरपणा किंवा ताप यावर लक्ष ठेवा. कारण पावसाळ्यात बुरशीमुळे होणारा जंतूसंसर्ग (किंवा जीवाणूंचा) होणे शक्य असते. अशी लक्षणे हे जंतूसंसर्गाचे द्योतक असते आणि त्यावर ताबडतोड उपचार करणे आवश्यक असते. अथवा गँगरीन होऊ शकेल.

  • प्लास्टर स्वच्छ ठेवा आणि ते ओले करू नका. अथवा त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होतील. त्याचप्रमाणे प्लास्टर ओले झाल्यास ते तुटू शकते.

  • गुदगुल्या, टोचणे, बधीरपणा, वेदना होणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जखम बरी होताना ही लक्षणे दिसून येतात, पण सतत जाणवत असतील मात्र ते गुंतागुंतीचे लक्षण आहे.

  • पाठीच्या कण्याला दुखापत झाली असेल तर दुखापत बऱ्यापैकी बरी होईपर्यंत डॉक्टर तुम्हाला हालचाल करण्यास मनाई करतील. काही प्रकरणांमध्ये बसताना आणि उभे राहताना पाठीला आणि पायाला स्प्लिंट्सचा आधार देण्यात येतो.

  • दुखापतीच्या स्वरुपावरून प्रथमोचपचार ठरत असतात. उघड्या जखमेची जंतूसंसर्गाबाबत तपासणी करावी लागते. गंभीर स्वरुपाची जखम झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवावी. अँटिसेप्टिक लिक्विड किंवा मलम लावावे. सामान्यपणे ड्रेसिंगची गरज नसते. पण जखम खोल असेल तर डॉक्टरची भेट घ्यावी. गेल्या ६ महिन्यांमध्ये धनुर्वाताचे इंजक्शन घेतले नसेल तर ते घ्यावे लागेल. जखम स्वच्छ आणि कोरडी ठेवा. बर्फ लावून किंवा क्रेप बँडेच आणि किमान हालचाल करून वेदना कमी करता येऊ शकतील.

  • अधिक गंभीर दुखापत झाल्यास त्या व्यक्तीला फार फिरवू नका. त्या व्यक्तीला स्थिर होऊ दे आणि त्याला तातडीच्या तपासण्यांसाठी आणि उपचारांसाठी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे.

  • नियमित स्ट्रेचिंग व्यायम आणि दैनंदिन शारीरिक व्यायामुळे अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण होणार नाही. दिवसातून दोन वेळा स्ट्रेचिंग करणे हितावह ठरते. पण ते योग्य प्रकारे केले नाही तर त्यानेही दुखापत होऊ शकते.

  • प्लास्टर काढल्यानंतर लगेचच आरामात चालता येणे कठीण असते. तुम्हाला हालचाल करताना घट्टपणा आणि मर्यादा जाणवू शकेल. तुम्ही फार काळ बसून राहू नका. दर तासाला छोटा ब्रेक घ्या आणि थोडी चाल करा. त्याचप्रमाणे हाताचीही हालचाल करा. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होईल. स्नायू स्ट्रेच करण्यासाठी आणि लवचिकता वाढविण्यासाठी योगासने हासुद्धा उत्तम उपाय आहे.

  • सांध्यांवरील ताण कमी करण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा. जीवनसत्वे मुबलक असलेला (विशेषतः क जीवनसत्व),ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असलेला आहार घ्यावा. धुम्रपान,मद्यपान टाळावे आणि इतर आजार (रक्तदाब,हायपरटेन्शन) नियंत्रणात ठेवावेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -