घरलाईफस्टाईलघरात ठेवलेल्या कांदा बटाट्यांना कोंब आले तर काय कराल?

घरात ठेवलेल्या कांदा बटाट्यांना कोंब आले तर काय कराल?

Subscribe

अनेकदा कोंब फुटलेले कांदे,बटाटे वापरणे कठीण होते तसेच यामुळे लोकांना नुकसानाचा सामना करावा लागतो.

भारतीय जेवणामध्ये मुख्यत: कांदा,बटाट्यांचा हमखास समावेश असतो. जेवण बनवताना कांदा,बटाट्यांचा वापर केल्यास अन्नपदार्थ खाण्यास अधिक चविष्ठ व रुचकर लागते. यांचा वापर दरोरज होत असल्याने प्रत्येक व्यक्तीच्या घरात कांदा,बटाट्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू अनेकदा असे निदर्शनास येते की, साठवण्यात आलेल्या कांदा तसेच बटाट्याला कोंब फुटले आहे. यामुळे अनेकदा कोंब फुटलेले कांदे,बटाटे वापरणे कठीण होते तसेच यामुळे लोकांना नुकसानाचा सामना करावा लागतो. जर तुम्ही सुद्धा अशा समस्येचा सामना करत असाल तर आज आंम्ही तुम्हांला कांदे,बटाटे यांना कोंब येण्यापासून कसे सुरक्षित ठेऊ शकतात यासाठी महत्वपुर्ण टिप्स देणार आहोत. तसेच या टिप्स फॉलो केल्याने नक्कीच तुमच्या जवळील कांदा,बटाट्याला कोंब येणार नाही.

1- बटाट्यांना कागदामध्ये गुंडाळून ठेवणे
2- कांदा,बटाट्यांना नेहमीच ठंड आणि अंधार असणाऱ्या खोलीत जपून ठेवणे
3- बटाट्यांवर पाणी पडले असेल किंवा बटाटी ओलसर झाली असतील तर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून ठेवणे.
4- बटाटा नेहमी सुती कापडाच्या बॅगेत ठेवा.
5- गरम जागेवर कांदा,बटाटा ठेवल्याने कोंब येण्याची शक्यता जास्त असते.
6- कांदा नेहमी हवेशीर जागेवर स्टोर करावा.यामुळे कांद्यावर बुरशी येणार नाही
7- कांदा तसेच बटाटा नेहमी इतर भाज्यांपासून,तसेच फळांपासून लांब ठेवावे.
8- तसेच कांदा आणि बटाटा कधीच एकत्र स्टोर करु नये

- Advertisement -


हे हि वाचा – रोज अंघोळ करण्याचे आहेत ‘हे’ साईड इफेक्टस



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -