घरताज्या घडामोडीकेळ्याच्या सालीचे खत बनवण्याची पद्धत

केळ्याच्या सालीचे खत बनवण्याची पद्धत

Subscribe

असे बनवा केळीच्या सालीचे खत

केळीचे नियमित सेवन अनेक आजारांपासून सुटका मिळवून देते. केळ्याचे फायदे प्रत्येकाला माहित आहेत. केळी केवळ खाण्यासाठीच नव्हे तर गार्डनसाठीही उपयोगी आहेत. होय, केळीची साल वापरून तुम्ही तुमच्या गार्डनची माती सुपीक बनवू शकता. अशा मातीत तुमच्या घरची बाग अधिक बहरेल. जर तुम्ही नेहमी केळी खाऊन साल फेकून देत असाल तर थांबा. केळीच्या सालीत अनेक पोषण तत्व असतात. यामुळे गार्डनच्या झाडांना पोषण मिळते. म्हणून आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीपासून खत बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

केळीच्या सालीपासून खत कसे बनवावे ?

- Advertisement -

सर्वप्रथम केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून त्यात गरम पाणी मिसळा. हे पाणी थंड झाल्यावर झाडांना द्या. यामुळे केळीतील प्रथिने झाडांना मिळतील व झाडे लवकर वाढतील.

दुसरी पद्धत म्हणजे केळीची साल पाण्यात उकळून घ्या. दोन आठवड्यानंतर हे पाणी झाडांना टाका. साल पाण्यात पूर्णपणे मिसळली नसेल तर पाणी आणखी काही दिवस तसेच ठेवा.

- Advertisement -

तिसरी पद्धत म्हणजे केळीची साल खतात मिसळा. यासाठी साल कापून खतात मिसळून घ्या. काही दिवसांनी हे खत झाडांना टाका. यामुळे जमिनीत पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढून झाडे बहरतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -