घरलाईफस्टाईलअंड आणि दुधापासून बनवा 'हेल्दी रेसिपी', तंदुरुस्त शरीरासाठी ट्राय कराच

अंड आणि दुधापासून बनवा ‘हेल्दी रेसिपी’, तंदुरुस्त शरीरासाठी ट्राय कराच

Subscribe

घरात दरोराजच्या पदार्थात जर अंड आणि दुधाचा समावेश केला तर निश्चित आपल्याला याचा फायदा होऊ शकतो

आपल्या शरीराला सूदृढ व तंदुरुस्त बनवण्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करत असतो. कधी अमुक एक प्रोटीन पावडर घ्या, तमुक एका जिम मध्ये जा अश्या प्रकारच्या उपायांनी अनेकांना भांबावून सोडले आहे. पण आपल्या घरात अगदी कमी किमतीत उपलब्ध असणार्‍या आरोग्यदायी वस्तूंकडे आपण नेहमी कानाडोळा करतो. घरात दरोराजच्या पदार्थात जर अंड आणि दुधाचा समावेश केला तर निश्चित आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. अनेकदा लहान मुलांना नाहीच तर मोठ्या माणस सुद्धा अंड खाण्यास आणि दूध पिण्यास टाळाटाळ करतात यामुळे एका छोट्याश्या रेसिपी द्वारे तुम्ही त्यांचे मतपरिवर्तन करू शकतात. आज मात्र तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत ज्यामधे भरपूर प्रमाणात पोषकतत्व साठलेले आहेत. दूध आणि अंड यामध्ये असंख्य प्रमाणात प्रोटीन,विटामीन,कॅल्शियम आढळून येते यामुळे मोठ्या माणसापासून ते लहान बाळ देखील याचे सेवन करू शकतात पहिल्यांदा आपण अंड आणि दुधा पासून होणारे फायदे आणि नुकसान जाणून घेऊया.

- Advertisement -

अंड्यापासून होणारे फायदे – सॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन, जीवनसत्त्व आणि खनिज अंड्यात आढळून येते. तसेच ओमेगा ३ अॅसिड ज्याप्रमाणे माश्यांमधे असते तसेच अंड्यामध्ये सुद्धा याचं प्रमाण सापडले आहेत. अंड्यात प्रोटीनची मात्रा भरभरून असते यामुळे अंड खल्यास शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते . यासोबतच अंड्यात ल्युटीन, कोलीन आणि झिंक याचे सुद्धा गुणधर्म आढळले जातात.

- Advertisement -

दुधापासून होणारे फायदे – सगळ्यांनाच ठाऊक आहे की दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. हाडे व दात मजबूत करण्यासाठी आणि लहान बाळांच्या शारीरिक विकाससाठी दूध हे महत्वपूर्ण भूमिका बजावते. दुधामध्ये विटामीन ब ,ड मॅग्नेशियम,लोह अशी जीवनसत्वे आढळून येतात. यामुळे लहान बाळ १ वर्षाचे झाल्यावर त्याला गायीचे दूध पाजू शकतात यामुळे त्याच्या शारीरिक विकासात वाढ होईल. तसेच मोठी माणसे सुद्धा आपल्या आरोग्य निरोगी राहावे पचन क्रिया सुरळीत राहावी, यासाठी दूध पिऊ शकतात.

 

साहित्य

१ कप दूध
१ अंड
१ चमचा साखर
चिमुटभर कळीमिरी पावडर

कृती
एका भांड्यामध्ये दूध घेऊन त्यात अंड घाला (पिवळ्या बलक सह) साखर आणि कळीमिरी पावडर टाका. मिश्रण एकत्र करून गॅसवर मंद आचेवर ५ ते १० मीन शिजवून घ्या. मिश्रण जाडसर होत नाही तोवर त्याला ढवळत रहा. संपूर्ण मिश्रण व्यवस्तीथ शिजलाहे की नाही याची खात्री करून घ्या आणि थंड झाल्यावर तुम्ही हे बाळाला खायला देऊ शकता. लहान मुलचं नाही तर अनेक मोठी माणसे सुद्धा ही हेल्दी डिश आपल्या डाएट मध्ये सहभागी करून घेऊ शकतात

महत्वपूर्ण टीप – जर तुम्हाला अंड आणि दुधापासून अलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता. तसेच लहान मुलांना देखील आपल्या फॅमिली डॉक्टरांशी सल्ला घेऊनच वरील  रेसिपी बनवून खायला द्यावी.


हे हि वाचा – या मेडीकल गॅझेट्सनी घरच्या घरी करा मेडीकल चेक अप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -