Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल तुळशीचे औषधी गुणधर्म

तुळशीचे औषधी गुणधर्म

तुळस ही एक वनस्पती असली तरी या तुळशीचे मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी फायदे आहेत. तुळशीच्या वनस्पतीचा अनेक आजारांवर औषधी गुणधर्म म्हणून वापर केला जातो. ते कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया.

Related Story

- Advertisement -

प्रत्येक घराच्याबाहेर किंवा बालकनीत तुळस ही असतेच. ही तुळस अंगणात ठेवण्यापूर्तीच मर्यादीत राहिलेली नसून या वनस्पतीचे औषधी गुणधर्म देखील तितकेच महत्तवाचे आहेत. नेमके तुळशीचे कोणते औषधी गुणधर्म आहेत ते जाणून घेऊया.

- Advertisement -

मलेरिया आणि डेंग्यू तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळस गुणकारी आहे. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात साखर, वेलची पावडर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने टाकून ते पाणी उकळून घ्यावे. हे पाणी ताप आलेल्या व्यक्तीला तीन – तीन तासाने द्यावे यामुळे ताप उतरण्यास मदत होते.

coughingसर्दी – खोकला हा आजार केव्हा ही होतो. याकरता आपण डॉक्टरांकडे जाणे देखील टाळतो. अशावेळी अंगणातील तुळशीची ताजी पाने धुवून चावून खावी. अथवा वाळवलेल्या तुळशीच्या पानांचा चहा करुन पिल्यास सर्दी – खोकला कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर घसा खवखवल्यास तुळशीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो.

- Advertisement -

mosquito-bitesएखाद्या व्यक्तीला मुंगी किंवा डास चावल्यास त्या जागेवर वेदना होतात. अशावेळी तुळशीची पाने त्या ठिकाणी चोळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

vomitउलट्यांचा त्रास होत असल्यास तुळशीच्या पानांचा रस, आल्याचा रस आणि मध यांचे मिश्रण करुन तो काढा पियाल्यास उलट्या होणे थांबते.

Cancer-Logoकर्करोगावर तुळस ही गुणकारी आहे. कर्करोग झालेल्या व्यक्तींला तुळशीच्या पानांचा रस आणि २० ग्रॅम दही नियमित एकत्र करुन द्यावे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

weight-lossवजन कमी करण्यासाठी ताजे दही आणि तुळशीची पाने यांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

bad-breathवाळवलेल्या तुळशीच्या पानाची पावडर आणि मोहरीचे तेल यांचे एकत्र मिश्रण करुन दाताना मसाज केल्यास दातांचे रोग होत नसून दात किडण्यापासून देखील वाचतात. त्याचबरोबर तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तुळशी पाने खाल्यास तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या कमी होते.

(टीप : हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा)

- Advertisement -